पान:श्री महापुरुष ब्रह्मेंद्रस्वामी धावडशीकर.pdf/१८३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

३५ बसावयालायक पाठविणें ह्मणून आज्ञा, त्यास राजश्री पिलाजी जाघ- वराव आले, याजबराबर लष्कर आलें, यांत टांकण तुर्की स्वामींनीं लिहिले प्रमाणें आढळत नाहीं. याउपरी प्रयत्न करितों. मिळाल्यास स्वामींच्या पा यांजवळ अंतर करूं ही गोष्ट सहसा होणार नाहीं. स्वामींचे आज्ञेपेक्षां अधिक तें काय आहे? सारांश स्वामींनीं आज्ञा केली याप्रमाणें टाकण तुर्की, उत्तम, स्वामी त्याजवर बसल्यानें संतोष पावतील ऐसा मिळाल्यास लक्ष- प्रकारें पाठवूं. “राजश्री रंगोपंत अकलेकर रुपये २५, व अकलेकर गां- वकरी रुपये १०, व अंताजी हरी परंचेकर रुपये २५, येणेप्रमाणे ठ रुपये उदईक घातले ते तुझी वसूल घेऊन पोतापैकीं साठ रुपये पावणें" ह्मणोन आज्ञा, त्याजवळ रुपये ६० पाठविले असत. बंदुखीविसीं आज्ञा केली त्याजवरून बंदुख एक पाठविली असे. आझांस राजश्री स्वामींनीं दर्शनास येणें ह्मणोन आज्ञापत्र आले आहे, त्याजवरून सातारा येतो. स्वामींचेही चरण दृष्टीस पाहून जे विनंती कर्तव्य ते करूं. कृपा केली पाहिजे हे विज्ञापना. १ अकले:- हा धावडशीजवळ एक गांव आहे. - ● २ स्वामींस बंदूक बाळगण्याचाही नाद होता. येथें रंगनाथस्वामी निगडी- करांचे वाचकांस स्मरण होईल. ते घोड्यावर बसण्यांत व निशाण मारण्यांत पटाईत होते. H- ३ सातारा येतों: – सातान्यास येतो (विभक्तिप्रत्यय गाळल्याचे दुसरे उ दाहरण ). महाराजांनी बोलावल्याप्रमाणे बाजीराव पेशवे पुण्याहून छ० ६ रवि- लावल ह्मणजे ता० २६ जुलई रोजी सातान्यास गेल्याचा दाखला सांपडतो. त्यावरून दिल्लीकडून स्वारी आटोपून आल्यानंतरची ही छत्रपतीची भेट होय. वरील दोनीं पत्रे बाजीराव पेशव्यांनी पुण्याहून लिहिली असावीत असें दिसत.