पान:श्री महापुरुष ब्रह्मेंद्रस्वामी धावडशीकर.pdf/१८२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

३४ विष्ट होऊन लेखनार्थश्रवणें संतोषातिशय झाला. “राजश्री स्वामी धावडशीस येऊन निष्ठापुरस्सर कित्येक भाषण केलें; पांच नगे वतन दिल्हें, विठ्ठलराव याचा इनाम दूर करून दरोबस्त गांव करून स्व दस्तुरें लिहून दिल्हें” ह्मणोन स्वामींनीं कितेक लिहिलें त्यावरून बहुत बहुत संतोष जाहला. स्वामी थोर तपस्वी, ईश्वरविभूति, आपली आज्ञा अमान्य करीसा या योग्य कोण आहे ? ईश्वर कोणी पाहिला असे ? मनुष्य निष्ठा घरील तरी मृत्युलोकीं स्वामी ईश्वरतुल्य आहेत. आप- णांस गांव दरोबस्त करून दिल्हे याचें अपूर्व काय ? सर्व आज्ञा आप- लीच आहे. “राजश्रीजवळ तुमची फारशी शिफारस केली. कि- तेक तुमच्या स्वहिताच्या गोष्टी सांगितल्या" ह्मणोन आज्ञा, ऐसीयास स्वामी आमची शिफारस न करील तरी कोण करील? माय बाप देव धर्म सर्व स्वामींचे पाय, न्यूनपूर्ण सर्व स्वामींचें, आझी स्वामींचे चरणां- कित, सर्व चिंता स्वामींस आहे. तेथें आमची शिफारस व बन्याच्या गोष्टी सांगितल्याचें अपूर्व काय ? आमची निष्ठा स्वामींच्या पायांपाशीं आहे. तेथें विस्तार आसीं काय लिहावा ? माळशिरसच्या घरास लां- कडे पाठविण्याविषयीं लिहिलें तरी सात तुळया व शंभर वांसे स्वा- मींच आज्ञेप्रमाणे माळशिरसास पाठविले आणि स्वामींस विनंतीपत्र पाठविलेंच आहे; त्याजवरून विदित होईल. घोडा टोंकण, उत्तम व १ हे पत्र मागील पत्राप्रमाणेच स्वामींच्या पत्राचें उत्तर आहे. मागील प त्रांतील व त्यांतील मजकूर एकच आहे. मात्र तो विशेष बहुमानपुरस्सर व निष्ठापूर्वक लिहिलेला आहे. शाहू महाराज स्वामींच्या भेटीस धावडशीस गेले तेव्हां स्वामींनीं बाजीरावांची शिफारस केली व छत्रपतींची मर्जी सुप्रसन्न करून सोडली. हे पाहून बाजीरावांस अत्यंत संतोष होऊन त्यांनी स्वामीविषयीं जे भक्ति- पूर्वक उद्गार काढिले आहेत ते परमाल्हादक आहेत. - २ टांकण घोडाः – भरधांव चालणारा चपळ घोडा. स्वामींस घोड्यावर बस ण्याचा सराव व नाद होता असे यावरून दिसून येतें.