पान:श्री महापुरुष ब्रह्मेंद्रस्वामी धावडशीकर.pdf/१८१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

३३ ● कडून माळशिरसच्या सनदा दिल्या. सचीव पंतांनी नम्रत्वें फारच वि नंती केली. राजश्रींनीं विनंती अतिशय केली. त्याजवरून क्षौर केलें. गोमूत्र चालतें केलें" ह्मणून लिहिलें; ऐसीयास राजश्री स्वामी येऊन स्वामींचें समाधान केलें, स्वामींनीं राजश्रींची विनंति मान्य करून क्षौर केलें, गोमूत्र चालतें केलें हे गोष्ट बहुत उत्तम केली. येविसींचा आह्मांस अतिशयेसी संतोष जाहला. सचीव पंतांकडील सनद आली आहे ही गोष्ट बहुतच बरी जाली. स्वामी थोर, पुण्यपुरुष, तपस्वी, जें मनावरी धरितील तें सिद्धीस पावेलच येविसीं संदेह नाहीं. तु- ळ्या व वासीयांविसीं आज्ञा याजवरून तुळया * कृपा केली पाहिजे हे विज्ञापना. [लेखांक २९] श्री. श्रीमत् राजश्री परमहंसबावा स्वामींचे सेवेसी:- अपत्यें बाजीराव बल्लाळ प्रधान कृतानेक विज्ञापना येथील कुशल आषाढ शुद्ध अष्टमीपर्यंत स्वामींचे आशीर्वादेंकरून यथास्थित असो विशेष स्वामींचे आशीर्वादेंकरून पत्र पाठविलें तें उत्तम समयीं प्र - - १ माळशिरसः – पुणे जिल्ह्यांत पुरंदर तालुक्यांत एक गांव आहे. येथे स्वामी केव्हां केव्हां येऊन राहत असत. येथे त्यांनीं भुलेश्वराचें देवालय व एक तलाव बांधिला आहे. हे गांव धावडशी येथील भार्गवरामाकडे इनाम आहे. - २ गोमूत्र चालतें केलें:- स्वामी तपोनिधी असून ते कित्येक दिवस नुसते गोमूत्र प्राशन करून राहत असत. त्यांची कोणी अवज्ञा केली तर तें गोमूत्र दे- खील घेत नसत. अशा वेळी शाहू महाराज स्वतः जाऊन स्वामींचे समाधान करीत असत. स्वामींचा राग बाह्यात्कारेंच असे त्यामुळे तो मग तेव्हांच ना- हीसा होत असे. ३ आषाढ शुद्ध अष्टमी: - ता. २७ जून १७३४. ३