पान:श्री महापुरुष ब्रह्मेंद्रस्वामी धावडशीकर.pdf/१७७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२९ आह्मांकडील व्यंकाजी राम त्याजपार्शी आहेत. त्याजपासून लिहवीत असतात. आह्मी त्यांचे मुलुखाचे वाटेस जात नाहीं. वाटेनें दाणादुणा देतील. अभयसिंग जोतपुरास आहेत. आझी ग्वालेर भडावर प्रांतें आतां बाकी साकी राहिली आहे ते वसूल करून, मोंगल मांगें मागें आले तरी त्यांस हैरानपेरोसान करून, पाईची धांपा देऊन, धांवतां धांवतांच खराब होत तेंच करून, दायांत आणून, गांठ घालून, राजश्री स्वामींचे पुण्ये व वडिलांचे आशीर्वादें बुडवितों. आमची चिंता न करणे. मुख्य गोष्टी पादशाहाचे व खानदौराचे चित्तांत सलूख करावयाचें आहे. मोंगल यांणीं हिंमत धरली आहे. त्यांतें शीरउपस्त सादतखान आहे. याचा गर्व हत श्रीसंकल्पें जाहलियास सर्व मनोदयानुरूप होईल. जरी मनोदयानु- रूप सलूख जालिया करूं; नाहींतरी सलूख करीत नाहीं. दिल्लीभवतां मुलूख खालसा केला. पुढे सोनपत पाणिपत यमुनापार मुलूख राहिला; तोही ताराज करून, मोंगल अन्नास महाग होत ऐसेंच केले जाईल. मागाहून होईल तें वृत्त तुझांस लिहून पाठवूं. कदाचित् मोंगल दि. लीस राहिले, तरी आगरियास जाऊन अंतर्वेदींत उतरून, मुलूख कुल मारून ताराज करितों. नवाच निजामनमुलुख यांणीं गडबड केली, रेवा उतरले, तरी तुझ मागें शह देणें. पेशजी लिहिले आहे त्याप्रमाणें करणे. मारून ताराज करणें. इकडेस सक नाहीं. तिकडेसही नाहींसा क ● ● १ व्यंकाजीरामः- पेशव्यांचे जयपूरच्या राजाजवळचे वकील. २ अभयसिंगः – हा जोधपुरचा राजा. हा फार दुष्टकर्मा होता. हा इ० स० १७२५ मध्ये आपला बाप अजितसिंग ह्याचा नीच रीतीनें वध करवून गादीवर बसला. ह्यानें दिल्लीच्या महमदशहा बादशाहास फार साह्य केलें व अहमदाबाद येथें सरबुलंदखानाचा पराभव केला. त्यामुळे बादशाहाची त्यावर फार कृपा जडली. हा इ० स० १७५० मध्ये मृत्यु पावला. -