पान:श्री महापुरुष ब्रह्मेंद्रस्वामी धावडशीकर.pdf/१७८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

. रणे. निजाम यास पायबंद असलिया उत्तम आहे. लोभ असों दीजे हे आशीर्वाद. " , १ हे पत्र फार महत्वाचें असून ह्याचेच आधारानें ग्रांटडफ साहेबांनीं दिल्लीच्या स्वारीचे वर्णन लिहिले आहे. त्यांनी टीपेमध्यें " A private letter, or rather journal, in the hand-writing of Bajee Rao to his brother Chimnajee Appa. Without various corroborative testimonies as to the facts, it bears that internal evidence of truth which commands confidence. " Page 236. ह्मणून ज्या पत्रा संबंधार्ने लिहिले आहे, तेंच हे पत्र होय. परंतु ग्रांटडफ ह्यांनी ह्या पत्रांतील हकीकत सन १७३६ सालाखाली घातली आहे त्याबद्दल शंका आहे. हा वृत्तांत सन १७३४ सालचा असावा. ता. ७ जिल्हेज नंतर दुसरे दिवशीं बुधवारीं ह्मणजे ता. ८ जिल्हेजी पातशाहांनी उत्तर पाठविले असे ह्या पत्रांत आहे. रा. मोडक यांच्या जंत्रीवरून असे दिसतें कीं, इ. स. १७३६ मध्ये ता. ८ जि ल्हेजला शुक्रवार व वैशाख शुद्ध १० पडतात. तसेंच इ. स. १७३५ मध्ये त्या तारखेस सोमवार येतो व वैशाख शुद्ध १० पडते. इ. स. १७३४ मध्ये त्या तारखेस बुधवार येतो. यावरून तोच सन बरोबर आहे. शिवाय निजा- माला पायबंद द्यावा असे ह्या पत्रांत आहे. यावरून तो ( निजाम) बादशाहास त्या वेळी मिळाला नव्हता है सिद्ध आहे. त्याची व बादशाहाची गांठ छ. १६ रबिलावल रोज सोमवार या दिवशीं पडली, असे एलियट व डॉसन यांच्या इतिहासांत आहे. व तो वार सन १७३४ मध्ये ता. ५ आगस्ट रोजी येतो. त्या वरून हे पत्र १७३४ चेंच आहे असें ठरतें कनिंगह्याम साहेबांच्या " Book of Indian Eras " नामक जंत्रीवरून देखील हेच साल बरोबर जमतें. तेव्हां ग्रांटडफ साहेबांचे १७३६ साल ग्राह्य धरितां येत नाहीं. ● " ग्रांटडफ साहेबांनी ही हकीकत लिहितांना दुसऱ्या बाजूचा विशेष आधारभूत असा ग्रंथ “सियारुलमुताखरीन" हा धरिला आहे. त्या ग्रंथांत जे सन दिले आहेत ते मोडकांच्या जंत्रीशीं मुळींच जमत नाहींत. बादशाहाची व नि जामाची भेट छ. १६ रबिलावल सन १९५० रोजी झाली, असें मूळ मुसलमान इतिहासकाराने लिहिले आहे. परंतु त्याचा इंग्रजी सन भाषांतरकाराने ता. २२ ●