पान:श्री महापुरुष ब्रह्मेंद्रस्वामी धावडशीकर.pdf/१७६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

कोसांवर मुक्काम केला. आझांकडील फिरंगोजी पाटणकरास गोळी ला- गोन ठार जाइला. वरकडही दहापांच माणूस व घोडीं जखमी जाहलीं. मोंगलाकडील दहापांच ठार झाले. दहावीस जखमी जाइले गुरुवारी सादतखान व खानदौरा व बंगस सारे कमर्दीखानाजवळ आले. आलावर्दीपासून झीलच्या तलावापर्यंत मुक्काम करून आहेत. आह्मी मों- गल पाठीवर घेऊन दाबांत आणून बुडवावें, या विचारें कूच करून रेवाद कोटेपुतळी मनोहरपुरावरून आलो. परंतु अद्याप मोंगल सारे आलावर्दी व झीलच्या तलावरी आहेत ह्मणोन बातमी वर्तमान आलें. व मीरहेंसनखान कोका पहिल्या झुंजांत जखमी जाहला होता, तो मेला ह्मणोन वर्तमान आलें. खानदौराचीं पत्रांवरी पत्रे राजश्री संवाई जय- सिंगजीस गेली. त्यांवरून ते पंधरा सोळा हजार फौज व तोफखाना देखील स्वार होऊन वासवियावर गेले आहेत. खानदौराचे भेटीस जातात. सवाईजीची पत्रे ममतायुक्त आपला मुलूख रक्षावा ह्मणोन येतात. व २८ १ रेवाद: रेवारी? रेवारी हैं दिल्लीच्या दक्षिणेस एक गांव आहे. रेवाद असे नांव मात्र सांपडत नाहीं. रेवाडी होऊं शकेल. २ कोटपुतळी: राजपुतान्यांत जयपूरपासून ईशान्य दिशेस ७४ मैलांवर एक गांव आहे. - ३. मनोहरपूर:- जयपूर संस्थानांतील एक लहानसे गांव. ४ मीर हसनखान कोका:- महमदशाहा बादशाहाच्या हुजुरपागेचा अधिकारी. ५ सवाई जयसिंगजी:- जयपूरचा प्रख्यात राजा सवाई जयसिंग. हा इ. स. १६९९ मध्ये गादीवर बसला. हा मुत्सद्दी असून मराठ्यांच्या बाजूचा होता. हा ज्योतिष व गणितशास्त्रांतही फार प्रवीण होता. हा इ. स. १७४३ मध्ये वारला. ६ बासवा: - जयपूर संस्थानांतील एक लहानसे जहागीरगांव. - .