पान:श्री महापुरुष ब्रह्मेंद्रस्वामी धावडशीकर.pdf/१७५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२७ वगैरे शहरांत पळोन गेले. दोन हजार घोडा पाडाव जाहला. पांच सहा हजार पळोन गेले. राजश्री राणोजी शिंदे याजकडील इंद्राजी कदम यांसी बोटास गोळी लागोन दोन बोटें उडोन गेलीं. वरकड नामांकित माणूस फार कोणी ठार झाले नाहीं. घोडे माणूस जखमी झाले. तद- नंतर आह्मीं झीलच्या तळावर मुक्काम केला. संध्याकाळच्या चार घटका दिवस बाकी राहिला. तो कमदीखान पादशाहा- पुरावरून आल्याची बातमी खबर आली. तेच क्षणीं आझी तयार होऊन गेलों. त्यांचे आमचे फौजेचें युद्ध जाहलें. बारांत गेलेला एक हत्ती राजश्री यशवंतराव पवार यांणी घेतला. घोडीं उंटें लष्करांत आली. त्यास दिवस अस्तमानास गेला. रात्रीचा दम घरून चौकीर्द मोंगल वेढून बुडवावा, तरी झीलेचा तलाव सोळा कोस लांब. उजवीकडे कमी- खान. पुढें शहर. दुसरें, आह्मी दिल्लीस गेल्याचें वर्तमान नवाब खा- नदौरा व सादतखान व महमदखान बंगस यांसी छे ७ जिल्हेजीं भंगळ- वारीं राधाकुंडाचे मुक्काम कळतांच, सडेसड होऊन पंचवीस तीसहजार फौजेनें बडेलास बत्तीस कोस येऊन मुक्काम केला. दुसरे दिवशीं आला- वर्दीच्या नालियावर पंचवीस कोस मुक्काम केला. गुरुवारी प्रातःकाळीं खानदौरा व सादतखान व बंगस व कमर्दीखान सारे एक होणार. एक झाल्यावर सोसणार नाहीं व शहर समीप. यास्तव मोंगलास टाकून चहूं १ यशवंराव पवार:- आनंदराव पवाराचा पुत्र हा फार शूर असून म राठ्यांच्या उत्तर हिंदुस्थानांतील पुष्कळ मोहिमांमध्यें होता. हा पानिपतच्या लढाईत पडला. ( कारकीर्द इ. स. १७४९-१७६१). - २ झील : ह्या शब्दाचा अर्थ तलाव असा आहे. झील हा परभाषेतील शब्द असल्यामुळे “झीलचा तलाव" अशी द्विरुक्ति झाली असावी. ३ छ० ७ जिल्हेज:- ता. ३० एप्रिल इ. स. १७३४. ४ आलावर्दी-नाल्याचे नांव दिसतें. ५ गुरुवारी ता. २ मे इ. स. १७३४ रोजीं.