पान:श्री महापुरुष ब्रह्मेंद्रस्वामी धावडशीकर.pdf/१७४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२६ आगी लावायाचें महकूच करून, पादशाहास व राजे बखतमल यांसी पत्रे पाठविलीं. शहरांतून दोन हत्ती व घोडीं उंटें आलीं होतीं तीं सांपडलीं. लष्करचे लोकांनीं शहरचे लोक भवानीचे यात्रेस बाहिर आले होते, त्यांस झांबडा झांबड केलें. दुसरे दिवशीं बुधवारी, पादशाहाचे आज्ञेनें राजे बेखतमल यांणीं उत्तर पाठविलें कीं धोंडोपंतांस पाठविणें. त्यावरून मशारनिल्हेस पाठवावें तरी आह्मी शहराजवळ आलो. यामुळे दिल्लींत गलबला झाला. यामुळे पाठविलें नाहीं. "भला मजुरा व खार पाठवून देणें. मशारनिल्हेस पाठवून देतों. आह्मी शहरानजीक राहिल्यानें शहरास उपसर्ग लागेल. याकरितां कुच करून झीलच्या तलावावर जातों" ह्मणून उत्तर पाठवून आह्मीं कुच केलें. शहरा- जवळून येत असतां पादशाहांनीं नवाच मीरहसनखान कोका दरोगा खास चौकी, नबाब अमीरखान व खोजे रोजअफजूखान, राजे शिवसिंग ज- मातदार रिसालेअमीर व मुजफरखान नायबबक्षीगिरी आहादी यांनीं व नवाब मुजफरखान खान दौराचे बंधु सात आठ हजार फौजेनिशीं शहराबाहेर रिकाबगंजाजवळ आले. राजश्री सटवाजी जाधव पुढे गेले होते. त्यांची व मोंगलांची गांठी पडली. झटापटी होत होती. मशारनिल्हेंनी आझांस सांगोन पाठविलें त्याजवरून राजश्री मल्हारजी होळकर व राणोजी शिंदे व राजश्री तुकोजी पवार व जिवाजी पवार व यशवंतराव पवार, व मानाजी पायगुडे व गोविंद हरी पाठविले. त्यांचे यांचें झुंज होऊन मोंगल मोडिले. राजे शिवसिंग वगैरे दहा बारा दरबारी ठार झाले. नवाब मीरहसनखान कोका जखमी झाला. दिगरबादे चौकीं पादशाहाचे अडीच तीनशें मेले. चारशे माणूस जखमी जाहलें. रोजअफजुखान व अमीरखान व मुजफरखान व १ बुधवारः - ता० १ मे सन १७३४. २ बखतमलः— हा बखतमल कोण ? जोतपुरच्या अभयसिंगाचा भाऊ बख- तसिंग की काय ?