पान:श्री महापुरुष ब्रह्मेंद्रस्वामी धावडशीकर.pdf/१७३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२५ मुलुखांतून नेवातियाचे सरदें (सरहदें) डोंगरकिनाऱ्यानें चालिलों. खानदौरा व बंगस आगरियास गेले. यांची व सादतखानाची भेटी छ २ जिल्हेज जाहली. धोंडोपंत खानदौरापासीं होते. सादतखानांनीं खानदौरास सांगून पाठविलें कीं, "बाजीराव याची फौज आपण मोडली. बुनगे पळाले. ते खासाही चमेल उतरोन गेले. अद्याप तुझी त्याची खुशामत करितां. वकील ठेवून घेतला आहे. हा कोण्या विचारें ? वकिलास निरोप देणें. " त्यावरून धोंडो गोविंद वकील यांसी निरोप दिल्हा. सादतखानानें सां- गितलें यावरून वकिलास निरोप द्यावा असें खानदौराचें थोरपण नव्हतें. परंतु त्यांनी त्याचा शक चित्तांत न आणून यासी निरोप दिल्हा. आह्मां- जवळ आले. कमर्दीखान व अजमुल्लाखान वगैरे आले. आह्नीं त्यांजसीं गांठ न घातली. साता कोसांवर उजवे बाजूस आमचे हातें त्यांस टा- कून, लांब लांब मजली वीस वीस कोसांच्या करून, दोन मजलींनीं छ० ७ जिल्हेजीं, दिल्लीस बारापुला व कालिकेचें देऊळ उजवें हातें टाकून जाऊन, कुशबंदी नजीक शहर येथे मुक्काम केला. पुन्यास आगी देऊन खाक शहर करावें, त्यास दिल्ली महास्थळ, पादशाही बरबात जालियांत फायदा नाहीं. दुसरें, पादशाहाचे व खानदौराचे चित्तांस सलूख करावयाचे आहे. मोंगल यांस सलूख करूं देत नाहींत. व अमर्यादा केल्यास, राजकारणाचा दोरा तुटतो. याकरितां अनुकूल करून घेऊन चूडामणाचा पूर्ण पराभव केला; आणि बदनसिंग ह्यास ठाकूर ही पदवी देऊन दीग येथे जाट लोकांच्या गादीचें अधिपति केलें. ह्याच्या नांवासंबंधानें घोंटाळा आहे. मराठी पत्रांत दमनसिंग असे आहे व इंग्रजी पु स्तकांतून बदनसिंग असे आढळते. याचाच मुलगा सुरजमल जाट हा मरा- ट्यांच्या इतिहासांत प्रसिद्ध आहे. ह्यानेंच पुढे आपणांस राजा किताब घेऊन भरतपूर येथे राज्य स्थापिलें. १ दिल्लीच्या गादीविषयी मराठ्यांस किती पूज्यबुद्धि वाटत होती, हें बाजीराव पेशव्यांच्या लिहिण्यावरून व्यक्त होत आहे. दिल्लीच्या पातशाहीचा मान शाहू महाराज सदैव ठेवीत असत हे प्रसिद्धच आहे.