पान:श्री महापुरुष ब्रह्मेंद्रस्वामी धावडशीकर.pdf/१७०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२२ वैशाख वद्य छ. १५ जिल्हेज मु॥ नजीक सवाई जयनगर जाणून स्वकीय कुशल लिहित जाणें विशेष. बुनगे बुंदेलखंडाचा राजा जैगतराज याचे हवाली करून, बुंदेलखंडांत रवाना करून, आझी सडे जाइलों. याचें वृत्त सादतखानाचें युद्ध होऊन सरदार आलियाचें वर्तमान विस्तारें लेखन करून चतुर्भुज कासिदांबरोबर पत्रे पाठविलीं तीं पावोन सविस्तर कळलेंच असेल. सादतखान यमुना उतरोन आगरियासी आला. त्यासी गांठ घालावी तरी तो आगरियाचा आसरा करून राहिला. तेथें जा- ऊन युद्ध करावें तरी तो आश्रियाचा असतां मोडेल न मोडेल कळतच आहे. - १ वैशाख वद्य ८ जिल्हेज: - ता० १५ मे इ० स० १७३४, बुधवार शके १६५६. २ सवाई जयनगर: राजपुतान्यांतील सुप्रसिद्ध जयपूर शहर हैं सवाई जयसिंगानें इ० स० १७२८ मध्ये वसविले; ह्मणून त्यास सवाई जयनगर अथवा जयनगर असें नांव पडले आहे. हे शहर फार प्रेक्षणीय आहे. - ३ जगतराज: — बुंदेलखंडांतील छत्रसाल राजाचा दुसरा मुलगा. हा बाजी- रावास आपला भाऊ समजत असे. ह्यानें बुंदेलखंडांत जेतपूर येथे गादी स्था- पन केली. हा मराठ्यांच्या सर्व मसलतींत सामील असून तो त्यांना वारंवार लागेल तें साह्य करीत असे. तो इ० स० १७५८ मध्ये मृत्यु पावला. सध्या बुंदेलखंडांत चरखारी ह्मणून जे संस्थान आहे ते याच्या वंशजांची एक शाखा होय. ४ सादतखान:- हा मूळचा खुरासान प्रांतांतला व्यापारी ह्याचें नांव महं- मद अमीन, हा स्वतःच्या कर्तबगारीनें दिल्ली दरवारांत योग्यतेस चढला. ३० स० १७२४ मध्ये त्यास राजा गिरिधराच्या मागून अयोध्येची सुभेदारी मि ळाली. नंतर त्यास बन्हाणउलूमुल्क ही पदवी मिळाली. ह्याचे व मराठ्यांचे फार वैर असे. हा नादिरशहाच्या लढाईमध्ये ता० ९ मार्च इ० स० १७३९ मध्ये मारला गेला. ह्याच्या मागून त्याच्या भावाचा मुलगा अबदुल मनसुखान सफदरजंग हा अयोध्येचा सुभेदार झाला.