पान:श्री महापुरुष ब्रह्मेंद्रस्वामी धावडशीकर.pdf/१६९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२१ रघुजी कदम व पिलाजी गायकवाड व चिमणाजीपंत दादा असे तीस पस्तीस हजार फौजेनिशीं आह्नांसीं युद्धास आले. छ० ४ सवालीं युद्ध जाहले. त्रिंबकराव दाभाडे व जावजी दाभाडे व मलोजी पवार व पिलाजी गायकवाडाचा पुत्र ऐसे चौघे ठार जाहले. उदाजी प वार व चिमणाजीपंत पाडाव जाहले. आनंदराव पवार व पिलाजी गायकवाड व कुंवरबहादर जखमी होऊन पळून गेले, व बांडे पळाले. फौज लुटली. हत्ती पाडाव केले. सारांश स्वामींचे आशीर्वादें फत्ते जाइली. आपणांस कळावें यास्तव लिहिले आहे. निरंतर स्वामींचें चिंतन करीत असों सदैव पत्रीं परामृष केला पाहिजे. आपणांकडील नारायणजी ढमढेरे ठार पडले व आणखीही कित्येक लोक पडले व जखमी जाहले; परंतु कार्य जाहले. कळले पाहिजे. सेवेसी श्रुत होय हे विज्ञापना. [ लेखांक २७] श्री. श्रियासह चिरंजीव राजश्री आपा यांसी:- बाजीराव बल्लाळ आशीर्वाद उपरी येथील कुशल तागाईत १ पिलाजी गायकवाड:- बडोद्याच्या गायकवाडांचा मूळपुरुष दमाजी गा- यकवाड याचा पुतण्या ( इ० स० १७२२ - इ० स० १७३२ ). - २ चिमणाजीपंत दादाः - इतिहासामध्ये चिमणाजी दामोदर ह्या नांवानें हा प्रसिद्ध आहे. शाहू महाराजांस प्रारंभी ज्या पुरुषांनी साह्य केले त्यांपैकी हा एक होय. याजकडे पागा बरीच होती. ग्रांटडफनें ह्याजबद्दल “ He was a very active marauder" असे मोघम लिहिले आहे. ३ हे पत्र बाजीराव पेशव्यांनीं चिमाजीआपांस लिहिले आहे. ते चिमाजी- आपांनी स्वामींच्या अवलोकनार्थ जसेच्या तसेच पाठविले आहे. हे व बाजीरा- बांची दुसरी पत्रे स्वामींस पाठविल्याबद्दल चिमाजीआपांच्या पत्रांत उल्लेख आहे. ( ते पत्र चिमाजीआपांच्या पत्रांमध्ये दिले आहे. ) बाजीरावांकडून किंवा चि माजीआपांकडून स्वारीतून वगैरे जी पत्र सातारकर महाराजांस किंवा पुण्यास येत असत, तीं स्वामींच्या अवलोकनार्थ जशींच्या तशींच पाठविण्याचा परिपाठ होता. पुणे नगर वाचन मंदिर, पुणे धर्म ....कमक Jaa ..... 4404