पान:श्री महापुरुष ब्रह्मेंद्रस्वामी धावडशीकर.pdf/१७१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२३ जरी गंभीरं यमुनेच्या संगम दिल धरून रहावें तरी ते जागा जवून कों- त र खळ्या फार. खानडवरा व मैहमदखान बंगस वगैरे दिल्लीहून आगरियास येत होते व सादतखान एक जालिया मनसबा भारी प डेल. याजकरितां संगमीं राहणें उत्तम नव्हे. दुसरें, सादतखानांनीं पाद- शाहास व खानडवरा व कमरदीखान वगैरे अमिरांस लेहून पाठविलें कीं, "मराठीयांची फौज यमुना उतरोन आली होती ते बुडविली. दोन हजार स्वार मारिले, व दोन हजार नदींत बुडाले. मल्हारजी होळकर व विठोबा बुळे कामास आले. बाजीराव याची धाड आली होती, तिची गत हे जाहली. त्याचे फौजेंत बाकी राहिली नाहीं. आ- पण यमुना उतरोन मराठे बुडवून चॅमेली पार करितों." ह्मणून - १ ही भरतपूर संस्थानांतून येऊन यमुनेस मिळणारी एक नदी आहे. २ खानडवराः – खानदौरान – ह्याचें मूळचें नांव अबुदल सामदखान असें Beale's Biographical Dictionary मध्ये दिले आहे. परंतु मि० आयहिंन ह्यांनी ख्वाजा महमद आशीम अर्से नांव लिहिले आहे. ह्यास जहांदरशहाच्या कारकीर्दीत ७००० स्वारांची मनसब मिळाली. महमदशहानें त्यास आश्रफखान व नंतर शमशामउद्दौला, खानदौरान मनसुरजंग बहादुर अशा किताबती दिल्या होत्या. परंतु मराठे त्यास खानडवरा किंवा खानदौरा असें ह्मणत असत. हा फार प्रौढ व भला मनुष्य होता. हा मराठ्यांशीं गोडी- गुलाबीनें वागत असे. हा नादिरशहाच्या दंगलीमध्यें ता. २३ फेब्रुवारी ३० स० १७३९ मध्ये जखमी झाला व ता० २७ रोजीं मृत्यु पावला. त्या वेळीं याचें वय ६८ वर्षांचे होतें. ३. महमदखान बंगष:- हा अलाहाबादचा सुभेदार असतां ह्यानें बुंदेलखं डच्या छत्रसाल राजास मनस्वी त्रास दिला; ह्मणून बाजीरावांनी इ. स. १७२९ मध्ये त्यावर चालून जाऊन त्याचा पूर्ण पराभव केला होता. ४ चमेली:- मध्यहिंदुस्थानांतील एक नदी. ही चंबळा ह्या नांवाने प्र सिद्ध आहे. ही विध्यपर्वतांतून निघून यमुनेस मिळते. -