पान:श्री महापुरुष ब्रह्मेंद्रस्वामी धावडशीकर.pdf/१६८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२० आरोग्य होय तो उपाय करणार स्वामी समर्थ आहेत. साकल्यवृत्त रा जश्री जगजीवनपंत निवेदन करितां विदित होईल. बहुत काय लिहावें, स्वामी अंतरसाक्ष आहेत हे विज्ञापना. वाजीराव. श्री. महाराज परमहंस श्री स्वामींचे सेवेसी:- चरणरज बाजीराव बल्लाळ प्रधान कृतानेक विज्ञापना. येथील क्षेम श्रीकृपें ता। छ० ५ सेवाल नजीक डेभोई यथास्थित असे. येथील वर्त- मान तरी त्रिंबकराव दाभाडे व उदाजी व आनंदराव पवार व कंठाजी [ लेखांक २६ ] - - १ छ ५ सवाल ह्मणजे ता० २ एप्रिल सन १७३१, रोज शुक्रवार चैत्र शुद्ध ७ शके १६५३. २ डभोई: – हे गांव बडोद्याजवळ आहे. बडोदा ग्याझिटियरमध्ये ज्या ठि काणी लढाई झाली त्या गांवाचे नांव भिलापूर अर्से दिले आहे. ३ त्रिंबकराव दाभाडे:- हा सेनापति खंडेराव दाभाडे यांचा पुत्र ह्यास सेनापतिपदाची बर्खे शाहू महाराजांकडून इ.स. १७२१ च्या मे महिन्यांत मिळाली होती. गुजराथची चौथसरदेशमुखी सरबुलंदखानाकडून बाजीरावांस मिळाल्यापासून तो त्यांचा द्वेष करीत होता. निजामानें ही संधि पाहून त्यास अनुकूल करून घेतले. त्यामुळे तो सैन्य जमवू लागला व लोकांमध्ये असे प्र सिद्ध करूं लागला की, “आमचा धनी मराठा, त्याचें राज्य बाजीरावाने घेतले. ते त्याचे त्यास द्यावयास जातो." त्यावरून बाजीरावानें त्यावर स्वारी करून उ भोई येथे त्याचा पराभव केला. , ४ उदाजी व आनंदराव पवार:- हे सख्खे बंधु. त्यांच्या वडिलांचें नांव सं- भाजी. हे शाहू महाराजांच्या कारकीदीत उदयास आले. त्यांपैकी आनंदराव पवार ह्याचें व पेशव्यांचे पुढे सख्य झाले व त्यास गुजराथ व माळवा प्रांताच्या चौथसरदेशमुखीच्या वसुलाचे काम मिळाले. ह्यानें इ. स. १७३४ नंतर धार येथे आपले कायमचे ठाणे केले. हा इ. स. १७४९ मध्ये मृत्यु पावला. उदाजीच्या मृत्यूचा सन बरोबर समजत नाही. परंतु तो पुढे लवकरच कैदेतून सुटून मलठण येथे आला व तेथें मृत्यु पावला.