पान:श्री महापुरुष ब्रह्मेंद्रस्वामी धावडशीकर.pdf/१६७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

हून आलियावर, स्वामी आन्चा करितील त्याप्रमाणें तो वर्तणूक करील. आपण नानास व वरकड मुलांस आशीर्वाद पूर्ण देऊन, झाडे लावून फळे घ्यावीं. या प्रसंगीं हे गोष्ट थोर आहे. आह्नीं लिहावें असें नाहीं. सेवेसी श्रुत होय हे विज्ञापना. [ लेखांक २४ ] श्री. श्रीमत् महाराज श्री स्वामींचे सेवेसी:- चरणरज राधाबाई विज्ञापना तागाइत जेष्ठ शुद्ध दशमी पावेतों वर्तमान यथास्थित असे विशेष. चिरंजीव राजश्री बाजीरायाकडील पत्रे आली, त्यांची नक्कल करून सेवेसी पाठविली आहे. त्यावरून सवि- स्तर वर्तमान विदित होईल. चिरंजीव राजश्री चिमाजींनीं गोवाई आंबे आह्मांस पाठविले; त्यांपैकी जासुदाबरोबर आंबे १० दहा स्वामी- कारणें पाठविले आहेत. सेवेसी श्रुत होय हे विज्ञापना. श्री. [ लेखांक २५] श्रीमत् श्री परमहंस स्वामींचे सेवेसी:- - - चरणरज राधाबाई साष्टांग नमस्कार विज्ञापना. येथील वर्तमान ताप कार्तिक बहुल द्वादशी मंगळवार सायंकाल दोड प्रहर रात्रीपावेतों स्वामींचे आशीर्वादें यथास्थित असे विशेष चिरंजीव राजश्री आपा प्रस्था xxxxxx परतीरीं गेले होते. त्यास बृहस्पतिवारीं सप्तमीस दहा घटका रात्रीस वेथा बहुत जाहली. उपरांत सावध जाहल्यावर प्रातः- कालीं दोन घटिका रात्रीस पालखींत घालून घरास आणिलें नालगुताची वेथा जाइली झणोन उपाय करीत आहों व वैद्यही पांच सात आहेत. तेही उपाय करितात. स्वामींनीं ईश्वरापाशीं संकट घालून चिरंजीवास १ नाना राधाबाईचा नातू - बाळाजी बाजीराव ऊर्फ नानासाहेब. २ गोवाई-गोमांतकी-गोव्याचे आंबे माधुर्य, स्वाद व रुचि ह्यांविषयों प्रसिद्धच आहेत.