पान:श्री महापुरुष ब्रह्मेंद्रस्वामी धावडशीकर.pdf/१६६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१८ क्षेम असों विशेष चिरंजीव राजश्री रायाचीं व राजश्री आपाचीं पत्र काल तृतीय प्रहरीं आलीं. उत्तम आहे............स्वामींचे सेवेसी पाठविलीं आहेत. त्यांवरून सविस्तर निवेदन होईल. अहोनिरं- तर आशीर्वादांचा वर्षाव करून, उभयतां चिरंजीव यशस्वी होऊन.... येत, तो अर्थ करणार स्वामी समर्थ आहेत. सेवेसी श्रुत होय हे विज्ञापना.' 9 [ लेखांक २२] श्री. श्रीमत् महाराज श्री परमहंसबावा सेवेसी: चरणरज राधाबाई साष्टांग नमस्कार विज्ञापना. येथील वर्तमान तागाइत माघ बहुल तृतीया पावेतों स्वामींच्या आशीर्वादेंकरून यथा- स्थित असे विशेष. चिरंजीव राजश्री रायाचीं व राजश्री आपाच पत्र आली, त्यांची नकल करून स्वामींकडे पाठविली आहे. त्यावरून सवि स्तर निवेदन होईल. सारांश, स्वामींच्या आशीर्वादाचा महिमा थोर, तन्मुळे सर्व गोष्टी अनुकूल आहेत. सेवेसी श्रुत होय हे विज्ञापना. [ लेखांक २३] श्री. २ श्रीमत् महाराज श्री परमहंसबावा स्वामींचे सेवेसी:- विनंति राधाबाई विज्ञापना. येथील कुशल स्वामींचे आशीर्वाद- करून असे विशेष पत्र पाठविलें तें पावलें. पांचा व घोडी पाठवून द्या- क्याविसीं लिहिलें, ऐशास आपा असतां हा कारभार जाहला होता. पांचा कोण्हाकडून आणविल्या होत्या किंवा नव्हत्या, आह्मांस ठावके नाहीं. स्वामींनीं चार रोज कृपा करावी. चिरंजीव राजश्री नाना स्वारी- ● - - १ हे पत्र किरकोळ आहे, तथापि ह्यावरून स्वामींच्या आशीर्वादाची योग्यता पेशव्यांच्या बायकांस देखील किती वाटत होती हैं व्यक्त होतें. २ मागील पत्रासारखेच हे पत्र आहे.