पान:श्री महापुरुष ब्रह्मेंद्रस्वामी धावडशीकर.pdf/१६५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१७ राधाबाई. [ लेखांक २०] श्री. श्रीमत् महाराज श्री परमहंस स्वामींचे सेवेसीः— आज्ञाधारक राधाबाई कृतानेक साष्टांग नमस्कार विज्ञापना. येथील क्षेम ता० माघ शुद्ध नवमी पावेतों स्वामींचे कृपावलोकनेंकरून समस्त क्षेम असों विशेष स्वामींनीं पत्र पाठविलें तें प्रविष्ट होऊन परम संतोष जाहला. असेंच सदैव आशीर्वादपत्र पाठवून परामर्ष केला पाहिजे. स्वामींचें आज्ञापत्र सादर जाहलें. तेथें आज्ञा कीं, सोवळ्यांत पांघराव- यास दुलई सोवळ्याची उत्तम हिंवाळाप्रावर्णास पाठवून देणें ह्मणून आज्ञा आज्ञेप्रमाणें पशमी दुलई, अस्तर ताफत्याचें संजाब ताफत्याचा सोमाजीचे गुजारतीनें तयार करून सेवेसी पाठविली आहे. अंगीकार करावयासी स्वामी समर्थ आहेत. चिरंजीवास तिळगुळ व पत्रे पाठ- विलीं तें आज्ञेप्रमाणें रवाना करितों चिरंजीवास अहोरात्र आशीर्वाद द्यावा, आणि शत्रुपराभव होय तो अर्थ करावा. चिरंजीव राजश्री रायोकडील पत्र आर्ले, तें आपणाकडे पाठविले असे. श्रवण करून पत्र माघारें पाठविले पाहिजे. सेवेसी श्रुत होय हे विज्ञापना. [ लेखांक २१ ] श्री. . , श्रीमत् महाराज श्री परमहंस स्वामींचे सेवेसी:- आज्ञाधारक राधाबाई कृतानेक साष्टांग नमस्कार विज्ञापना येथील कुशल तागाईत माघ शुद्ध एकादशी पावेतों स्वामींचे कृपेंकरून समस्त - १ राधाबाई:- बाळाजी विश्वनाथ यांची बायको. ही मल्हार दादाजी बर्वे यांची कन्या. ही फार शहाणी व चतुर बायको होती. हिची स्वामिचरणीं दृढभक्ति होती, असे या व पुढील पत्रांवरून व्यक्त होतें. , २ रायाकडील - बाजीरावांकडील. बाजीरावांस 'राव' किंवा 'राय' असेंच |- ह्मणत असत. २