पान:श्री महापुरुष ब्रह्मेंद्रस्वामी धावडशीकर.pdf/१६४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१६ मुक्काम किल्ले लोहगंड यथास्थित जाणोन स्वकीय स्वानंदलेखनाज्ञा केली पाहिजे. विशेषः— श्रीचा ऐवेज चिरंजीव राजश्री बाजीरावाकडून देववून हवाला घातला आहे. त्यास सांप्रत राजेश्री व चिरंजीवाचे लग्न- प्रसंगामुळे वोढीचा अर्थ जाला आहे तो पत्रीं ल्याहावासा नाहीं. ऐसी- यास सांप्रत चिरंजीवाकडून ऐवज मोहरा २५ सोनजी दळवी याज- बराबरी रवाना करविला तो ते रवाना करतील. तो घेऊन पावल्याचें आशीर्वादपत्र पाठविले पाहिजे. बाकी ऐवजही सत्वरींच रवाना केला जाईल. श्रीचे कार्यास आह्मांपासून अंतराय होणार नाहीं. विदित जालें पाहिजे. आह्मी स्वामींचे पदरींचे आहों. सर्व प्रकारें दया करून आशी- र्वादपत्रीं परामर्ष घेत गेले पाहिजे. कृपा केली पाहिजे. "सेवेसी विज्ञप्ति. १ लोहगड पुणे जिल्ह्यांत खंडाळ्यापासून ८ मैलांवर आहे. हा जुनाट किला ब्राह्मणी राज्यापासून इतिहासप्रसिद्ध आहे. हा शिवाजीने इ. स. १६४८ मध्ये घेतला परंतु पुनः तो औरंगजेबाकडे परत गेला. परंतु मराठ्यांनी पुनः हस्तगत केला. हा इ. स. १७१३ मध्ये कान्होजी आंग्र्यापासून बाळाजी विश्वनाथाकडे आला. येथें बाळाजी विश्वनाथ राहत असे. २ श्रीचा ऐवजः– स्वामी संकटप्रसंगी पेशव्यांस व इतर सरदारांस दे- वाच्या नांवानें कर्ज देत असत त्या पैशास 'श्रीचा ऐवज' ह्मणत. पेशव्यांच्या दप्तरी स्वामींकडील कर्जाचा हिशोब श्रीभार्गवराम देवाच्या नांवानेंच चालत असे. ३ राजश्री शाहुमहाराज. ४ चिरंजीव-लग्नप्रसंगाचा संबंध दिसतो. त्याअर्थी चिमाजीआपांचे लग्न असावें. ५ शेवटच्या दोन तीन वाक्यांवरून बाळाजीची स्वामींविषयींची निष्ठा व्यक्त होते.