पान:श्री महापुरुष ब्रह्मेंद्रस्वामी धावडशीकर.pdf/१६३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१५ लोणकरानें आपणाजवळ प्रसंग केला. त्यावरून त्याची निर्वाण आपण बाजीरावास केली तरी त्याचा विचार या प्रकारचा आहे. पाटीलकी गायकवाड याचीच खरी आहे. यशवंतराव गायकवाड येथें सेवा करीत आहेत आणि ज्यापेक्षां हे पत्र लिहिलें असे तरी लोणकराचे सांगण्यावरून अन्यथा गोष्टी आपण चित्ताला न आणावी. त्यास निरा- करण करून सांगोन, तो फिरोन गायकवाड याचे पाटीलकीची चर्चा न करी ऐसें करावें. व बाजीराव प्रधान यांसही सांगोन पूर्वी त्यांणीं निवडले आहे त्याप्रमाणें लोणकरास देवून वर्तवीत ऐसें करणें. सर्व न्यायनीत आपण जाणत असतां आझीं तपशीले आपणास ल्याहावेंसें काय आहे ? बहुत लिहिणें तरी आपण सुज्ञ आहेती. हे विनंति. पेशवे. बाळाजी विश्वनाथ पेशवे. [ लेखांक १९ ] श्री. श्रीमंत परमहंस भृगुनंदनस्वरूप स्वामींचे सेवेसी.– चरणरज बाळाजी विश्वनाथ कृतानेक नमस्कार विनंति आत्रत्य कुशल स्वामींचे आशीर्वादें ताा वैशाख शुद्ध सप्तमी रविवासर पावेतों - १ बाळाजी विश्वनाथ पेशवे हे सातान्यास येऊन प्रधानपदारूढ होण्यापूर्वी चिपळुणास मीठबंदरावर हबशाचे तर्फे कारकून होते. त्या वेळीं बोंद्रस्वामी चिपळुणाजवळील परशराम नामक गांवी असत. त्यांच्यावर बाळाजी विश्वनाथाची परम भक्ति होती व त्यांच्याच आशीर्वादप्रसादानें त्यांस पेशवाईचीं वस्त्रे मिळाली. स्वामींचा व बाळाजी विश्वनाथांचा पत्रव्यवहार फार महत्वाचा असला पाहिजे, परंतु तो उपलब्ध नाहीं ही दिलगिरीची गोष्ट होय. आह्मांस त्यांचें फक्त हे एकच पत्र मिळाले आहे.