पान:श्री महापुरुष ब्रह्मेंद्रस्वामी धावडशीकर.pdf/१६०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१२ [ लेखांक १६] श्री. श्रीमत् परमहंस राजश्री बावा स्वामींचे सेवेसी.- सौभाग्यादिसंपन्न मातुश्री बाईसाहेब दंडवत प्रणाम विनंति उपरी येथील कुशल जाणून स्वकीय लेखन केले पाहिजे विशेष. आपण श्रा- वण शुद्ध चतुर्थीस समाधीस बैसलां, त्यास कोणे दिवशीं उठणार तें लिहिले पाहिजे. आमचे शरीरीं आपण येथें आलें होतें ते समयीं आ रोग्य नव्हतें तैसें ह्रीं जाहले आहे. आपले आशीर्वादेंकरून आरोग्य होईल. चिंता न करणें. आपण कोणे दिवशीं कोणी वेळेस समाधींतून बाहेर येणार तो दिवस लेहून पाठवावयास आज्ञा केली पाहिजे. जो दिवस नेमला असे ते दिवशीं पालकी पाठविली जाईल. पालकी पाठ- वून धावडशीस मठीस पाविली जाईल. बहुत काय लिहिणें हे विनंति. कोल्हापुरकर ताराबाई व संभाजी. श्री. - [ लेखांक १७ ] श्रीमत् हरिभक्तिपरायण राजमान्य राजश्री स्वामी वडिलांचे सेवेसी:- प्रति श्रीमन् मातुश्री ताराबाईसाहेब क्षेम उपरी वडिलांकडील बहुत दिवस खबर बखर कळों येत नाहीं. तरी वडिलीं ऐसें न करावें. आह्मां- कडील वर्तमान तरी वडिलांस परस्परें विदित जाहलेच असेल. परंतु - - १ बाईसाहेब: राणी सखवारबाई किंवा सगुणाबाई ह्यांपैकी एक असावी. २ स्वामी समाधीस बसले म्हणजे समाधि समाप्त होईपर्यंत त्यांची कोणाची भेट होत नसते. समाधि समाप्त झाली म्हणजे त्यांस समारंभेकरून पालखीत बसवून धावडशीच्या मठांत नेत असत. ही पालखी सातारच्या महाराजांकडून जात असे. ३ ताराबाई: राजारामाची बायको व कोल्हापूर संस्थानची मूळस्थापना करणारी सुप्रसिद्ध ताराबाई (इ. स. १७०० - इ. स. १७६१). हिचीही स्वामींवर भक्ति असून तिचा स्वामींशी पत्रव्यवहार होता असे दिसतें.