पान:श्री महापुरुष ब्रह्मेंद्रस्वामी धावडशीकर.pdf/१६१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१३ , वडिलांस आमचें वर्तमान निवेदित व्हावें. याबद्दल मुजरत आप्पाजी कृष्ण व हुजरे ऐसे पाठविले आहेत. हे वडिलांस स्वमुखें निवेदन कर तील. तीं आमचे मुखचीं वचनें ऐसीं जाणोन, वडिलीं सविस्तर चि त्तांत आणोन, आपले मनीं गोष्ट ठेविली पाहिजे. जो धंदा एक दोन वेळां केला, परंतु ती गोष्टी साधोन आली नाहीं. तेंही विदित जाहलेंच असेल. बरें, होणार तें समयीं होईल. आपला आशीर्वाद मस्तकीं आहे तों कांहीं आपणास कोणे गोष्टीची चिंता आहे असें नाहीं. प्रस्तुत ख र्चाची प्रतिकूलता नाहीं तरी वडिलीं खर्चाची पोक्ती बेगमी व सकला- दची पासोडी एक व बारीक लांब रुंद नेसावयाचे शेले दोन ऐसे देऊन मशारनिल्हेची रवानगी करून सत्वर पाठविले पाहिजे. बिगर वडिलांचे प्रासादिक वचनावांचून आपलें कांहीं बरें होतें ऐसें कांहीं नाहीं. आपले चित्तांत गोष्टी ठेविली पाहिजे. इतक्या उपरी वडिलांच्या चित्तास येईल तें केले पाहिजे. आजिपावेतों वडिलांस संकट घातले नव्हतें. बहुत लिहिणें तरी आपण वडील सुज्ञ असा. [लेखांक १८] श्री. श्रीमंत परमहंस परिव्राजक धर्मविराजमान एकनेमप्राणायामप्रत्याहा- रादिअष्टांगयोगसिद्धि संपन्न भार्गवराम परमहंस स्वामीचरणारविंदाप्रतिः- अपत्यें संभाजी राजे दंडवत प्रणाम विज्ञापना विज्ञापना अत्रत्य कुशल माघ शुद्ध द्वितीया भोमवासरपर्यंत स्वामींचे कृपावलोकनेंकडून समस्त कुशल असे. स्वामींनीं पूर्ण कृपेकडून सर्वदा आशीर्वादपत्र प्रेषून परामर्ष करीत गेलें पाहिजे. विशेष मौजे मुंढवे ताा हवेली पुणे येथील पाटीलकी पुरातन गायकवाड यांची, त्याप्रमाणें हल्लीं चालत आहे व राजश्री यशवंतराव गायकवाड येथें सेवाही करितात. ऐसीयास - १ संभाजी राजे : - कोल्हापूरकर. कारकीर्द इ. स. १७१२ पासून इ. स. - १७६० पर्यंत.