पान:श्री महापुरुष ब्रह्मेंद्रस्वामी धावडशीकर.pdf/१५९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

११ [ लेखांक १४ ] श्री. तीर्थस्वरूप श्री परमहंस स्वामींचे सेवेसी:- अपत्यें सौभाग्यादिसंपन्न विरुबाई साष्टांग दंडवत विनंति उपरी येथील कुशल जाणून स्वकीय लिहिले पाहिजे. विशेष स्वामींनीं आशीर्वादपत्र पाठविलें तें प्रविष्ट होऊन अक्षरशः श्रुत झालें. कितेक दृष्टांत देऊन लिहिलें तर हे गोष्टी यथार्थच आहे. आह्मांस स्वामीं- पेक्षां अधिकोत्तर काय आहे ? राजश्री बाजीराव पंडित प्रधान यांचे मातुश्रींनीं आझांस सोवळें दिलें तें स्वामींकारणें राजश्री येसाजी महादेव कारकून जामदारखाना याजबरोबरी पाठविलें आहे. घेऊन पावल्याचें उत्तर पाठविणें माटेचें बीज व पोकळ्याचें बीज पाठविलें, तें प्रविष्ट जालें. जाणिजे बहुत काय लिहिणें कृपा निरंतर असों दिजे हे विनंति, दंडवत विनंति लिहिली परिसीजे. लोभ हे| अपयें बसवंतराव असो दिजे हे विनंति. - [लेखांक १५] श्री. तीर्थस्वरूप राजश्री परमहंस बावा स्वामींचे सेवेसी.- विनंती अपत्यसमान सौभाग्यादिसंपन्न सगुणाबाई दंडवत विनंति येथील कुशल ताा छ २० रजब पावेतों स्वामींच्या आशीर्वादेंकरून यथास्थित जाणून स्वकीय लेखन करावयासी आज्ञा केली पाहिजे, विशेष, मौजे रिळे ता० शिराळे हा गांव राजश्री येसाजी भोंसले यांनीं श्रीकडे दरोबस्त दिल्हा आहे, तेथें सरदेशमुखी व साहोत्रा याचा उपद्रव होता तो दूर करणें ह्मणून आज्ञा केली. तरी स्वामींनीं एक माणूस तेथें ठेवून यांजकडून रोखे येतील ते माघारे टाकावे. तेथून त्याचा बोभाटा आला ह्मणजे त्यास आज्ञा करणें ते केली जाईल. ये गोष्टीचें कांहीं अगाध आहे असें नाहीं. बहुत काय लिहिणें हे विनंति -