पान:श्री महापुरुष ब्रह्मेंद्रस्वामी धावडशीकर.pdf/१५८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

वांचे भेटीस गेलां, उत्तम केलें. त्यांनी स्वामींची पूजा सन्मानेंकडून केली. यावरून चित्तास बहुत आनंद जाला. तुझां महापुरुषांची पूजा न करीत तर कोणाची करतील? चिमणाजीपंताचें वर्तमान तर दैवी गतीस इलाज आहे ऐसें नाहीं ! त्याच्या चिरंजीवाचे परामर्षास अंतर ● होणार नाहीं. वरकड संतानवृद्धीचा मजकूर लिहिला तर आपली निष्ठा स्वामींच्या पायांसी दृढतर, आणि आपली कृपा आमचे ठायीं, ते अन्यथा होईल ऐसे नाहीं. आपले आशीर्वादकडून फलात्कारही होईल. प्रसाद श्रीफल दोन, साखरपुडा एक पाठविला तो पावला. अत्यादरें मस्तकीं वंदून स्वीकार केला. निरंतर आशीर्वादपत्रीं सांभाळ केला पाहिजे. बहुत काय लिहिणें कृपा निरंतर असों दिजे. हे विनंति. [ लेखांक १३] श्री. श्रीमंत तीर्थस्वरूप परमहंस बावा स्वामींचे सेवेसी- अपत्यें सौभाग्यादि संपन्न सगुणाबाई चरणावरी मस्तक ठेवून दंडवत प्रणाम विनंति उपरी येथील कुशल माघ बहुल नवमी पावेतों स्वामींचे आशीर्वादें क्षेम जाणोन स्वकीय कुशल लेखन करीत असले पाहिजे. विशेष स्वामींनीं आमची शपथ क्रिया घेऊन जे आज्ञा केली त्या शपथेप्रमाणे आज तागायत आपणाजवळून कांहीं अंतर पड़ों दिल्हें नाहीं. त्याकडून जें अंतर पडावयाचें तें पडत गेलें. परंतु कांहीं स्वामींच्या आज्ञेप्रमाणें अंतर पड़ों दिलें नाहीं. याउपरी आह्मी केल्या शपथाप्रमाणें उतराई जालों. उपरी आमची क्रिया सुटली. आह्मांस मोकळीक करून उत्तर पाठविले पाहिजे. हे पत्र एकांती वाचून आपले चित्तांतच गोष्ट असों द्यावी. कागद फाडून टाकिला पाहिजे, बहुत काय लिहिणें हे विनंति.