पान:श्री महापुरुष ब्रह्मेंद्रस्वामी धावडशीकर.pdf/१५७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

[ लेखांक ११] श्री. तीर्थस्वरूप राजश्री परमहंस स्वामी स्वामींचे सेवेसी:- अपत्यें सौभाग्यादिसंपन्न सखवारबाईसाहेब दंडवत विनंति उपरी येथील कुशल जाणोन स्वकीय कुशल लेखन करीत असले पा- हिजे. यानंतर येथील वर्तमान तर जंजीरे अंजनवेली येथें मोर्चेबंदी करून जेर केली आणि भाघ शुद्ध द्वितीया बुधवारी किल्ला फत्ते केला. दोनतीनशे माणूस शामलाकडील ठार झाले. व आपणाकडीलही थोडीं बहुत माणसें घोडर्डी ठार झालीं. ईश्वरें कार्य सिद्धीस नेलें. हें संतोषाचें वर्तमान स्वामींस कळावें यास्तव लिहिले आहे. बहुत काय लिहिणें हे विनंति. - [ लेखांक १२] श्री. तीर्थस्वरूप श्री परमहंस स्वामींचे सेवेसी:- अपत्यसमान सौभाग्यादिसंपन्न सखवारबाई व सौ० सगुणाबाई दंड- वत विनंति उपरी येथील कुशल जाणून स्वकीय कुशल लेखन करीत गेलें पाहिजे. यानंतर स्वामींनीं आशीर्वादपत्र पाठविलें तें प्रविष्ट जालें, लिहिलें कीं चिरंजीव राजश्री फत्तेसिंगदादा याचे भेटीस गेलो होतों. भेट जाली. बहुत सन्मान करून पूजा केली. हत्ती घोडे पालखींत बैसऊन आज्ञा दिली. सोमवारी धावडसीस आलों; व चिमणाजीपंतदादा यास देवाज्ञा जाली. त्याच्या चिरंजीवाचा परामर्ष करावा ह्मणोन लिहिलें. ऐशास चिरंजी- ● १ माघ शुद्ध द्वितीया बुधवार म्हणजे ता० १५ जानेवारी इ. स. १७३५. २ फत्तेसिंगदादाः – फत्तेसिंग भोंसले अक्कलकोटकर. - ३ चिमणाजीपंत दादाः - चिमणाजी कृष्ण भागवत स्वामींचे परमविश्वासू शिष्य व मुख्य कारकून हे इ. स. १७४९ मध्यें मृत्यु पावले. त्यावरून हे पत्र त्या सालचें असावें.