पान:श्री महापुरुष ब्रह्मेंद्रस्वामी धावडशीकर.pdf/१५६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

८ यावरी आपले स्वहित आहे. याकरितां अंतराय न करणें स्वामीं प्रति विशेष काय लिहिणें कृपा निरंतर असो दिजे हे विनंति. [लेखांक १० ] श्री. तीर्थस्वरूप श्रीमंत परमहंस स्वामी स्वामींचे सेवेसी:- अपत्यें सौभाग्यादिसंपन्न सखवारबाईसाहेब दंडवत विनंति उपरी येथील कुशल जाणून स्वकार्य लिहित गेले पाहिजे. विशेष:- आपण पत्र पाठविलें तें प्रविष्ट होऊन लेखनाभिप्राय श्रवण जाहला. तेथें आज्ञा जे धामणी व सोनगांव ता० खेड प्राणवली प्रांत राजापूर या गांवाच्या सनदा पाठवून देणें. तर आपले मागें पत्र आले त्यांत मजकूर लिहिला होता जे इंग्रजाची व आपली मैत्री आहे. ऐसीयासीं प्रस्तुत राजश्री स्वामींनीं आज्ञा केली, त्यावरून राजश्री तुळाजी आंग्रे अंजन- वेलीस वेढा घालून बैसले आहेत. तर मैत्रीकीमुळे इंग्रजास सांगून शा- मलाची मदत न करीत तो अर्थ केला पाहिजे, ह्मणजे गांव लिहिल्या- प्रमाणे स्वामींकडे येतील. रुपयांचा मजकूर लिहिला तरी राजश्री स्वा- मींची प्रकृति बरी झाल्या उपरांतिक रुपये मागून घेऊन स्वामींचे पाठ- विले जातील. रजईचा मजकूर लिहिला तर प्रस्तुत जामदारखान्यांत शाल नाहीं. शाल मेळवून आज्ञेप्रमाणे रजई पाठविली जाईल. आज्ञेस अंतर होणार नाहीं. बहुत काय लिहिणें हे विनंति. पौ छ १७ सफर सन खेमस, -- - - १ ह्या पत्रांत स्वामींची व इंग्रजांची मैत्री होती असा स्पष्ट उल्लेखच आहे. २ पैवस्ती म्हणजे दाखल तारीख १७ सफर सन खमस ही आहे. ह्या- वरून ता० ८ जुलई सन १८३४ ही तारीख असावी. अंजनवेल सर केल्याचा उल्लेख पुढील पत्रीं आहे. त्यावरून त्या पूर्वीचें हे पत्र आहे,