पान:श्री महापुरुष ब्रह्मेंद्रस्वामी धावडशीकर.pdf/१५५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

छत्रपतींच्या राण्यां. श्री. [ लेखांक ९ ] - तीर्थस्वरूप श्री परमहंस स्वामींचे सेवेसीः- अपत्यें सौभाग्यादिसंपन्न सखवारबाई दंडवत विनंति उपरी येथील कुशल स्वकीय लेखन करीत गेले पाहिजे. यानंतर स्वामींनीं आशीर्वादपत्र पाठविलें तें पावलें. श्रीचा प्रसाद पाठविला तो पावला. रुपये पाठवून दिले पाहिजेत ह्मणून लिहिलें, तर आपणासीं करार केला त्यास अंतर होणार नाहीं. ऐवज करून पाठविले जाईल. इंग्रेज बंद करावयास आपण ममईस जावें कीं काय ? आज्ञा जाली तर जाऊं ह्मणून लिहिले तर केवळ आपण जावें असा अर्थ नाहीं. परंतु कार्य होय ऐसा विचार करावा. आणि जेणेंकडून इंग्रेज बंद होऊन शाम- लास मदत न करी, आपणास सलूख राखे, तें करावें हें कार्य जालि- १ छत्रपति शाहू महाराजांस एकंदर लग्नाच्या स्त्रिया चार होत्या, व राख एक होती. त्यांची पादशाही लष्करांत दोन लग्ने झाली. रुस्तुमराव जाधव यांची कन्या अंबिकाबाई, व शिंदे यांची कन्या सावित्रीबाई. दुसऱ्या लग्नांत विरुबाई म्हणून एक स्त्री शिंदे यांनी महाराजांस अंदण दिली, ती त्यांनीं राख म्हणून ठेविली होती. परंतु ती फार पवित्र व सदाचरणी बायको असल्यामुळे शाहू महाराजांची तिजवर फार प्रीति होती. महाराज दक्षिणेंत आल्यानंतर त्यांनी कुवरजीराजे शिर्के यांची कन्या सखवारबाई व मोहिते यांची कन्या सगुणाबाई या दोन स्त्रियांबरोबर लग्नें केली. ह्यांपैकीं सखवारबाई, सगुणाबाई व विरुबाई यांची स्वामींवर फारच भक्ति होती हैं त्यांच्या पत्रव्यवहारावरून दिसून येईल. ● २ जंजिऱ्याच्या शिद्दीचें व मराठ्यांचें युद्ध चालले असतां इंग्रजांनीं शिद्दीस न मिळतां मराठ्यांस साह्य करावें व तत्प्रीत्यर्थ स्वामींनी इंग्रजांकडे प्रयल करावा अशाविषयीं हैं पत्र आहे. ह्यावरून इंग्रजांकडेही स्वामींचें त्या वेळीं धोरण होतें अर्से दिसतें, व छत्रपतींच्या राण्या राजकारणामध्यें लक्ष्य पुरवीत होत्या हेंही व्यक्त होतें.