पान:श्री महापुरुष ब्रह्मेंद्रस्वामी धावडशीकर.pdf/१५४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

६ आहेत. यांत चित्तास येईल तो मान्य केला पाहिजे, राजश्री राघोराम याबराबरी पाठविले आहेत. विदित होय. 'घोडे चार पाठविले आहेत. चित्तास येईल तो घेणें ही विनंति.' [ लेखांक ७ ] श्री. श्रीसकलतीर्थरूप राजश्री श्रीमत् परमहंस स्वामींचे सेवेसी. अपत्यसमानं शाहुजी राजे कृतानेक दंडवत विज्ञति. येथील कुशल फाल्गुन शुद्ध तृतीया सौम्यवासर स्वामींचे आशीर्वादें यथास्थित असों विशेष. स्वामींनीं आशीर्वादपत्र प्रीदिलें (प्रेषिलें ? ) तेथें आज्ञा जे, श्रीनें जें वदविलें त्यास संदेह आहे असें नाहीं. पत्र पत्रिकार्थ जाणून जतन करून ठेवणें हाणून त्यावरून स्वामींनीं आशीर्वादप्रसाद दिला; त्यास संदेह चित्तांत आणिजेतो असें नाहीं. सूचनार्थ विनंति लिहिली होती. त्यास निर्वाहरूप पत्रिकाच आज्ञा प्रमाण, संग्रहीं ठेविली असे. विदित होय. श्रीपदप्रसाद पाठविला तो पावला. सेवेसी विनंति. [ लेखांक ८ ] . श्री. श्रीसकलतीर्थरूप श्रीमत् परमहंस श्रीस्वामींचे सेवेसी:- अपत्यसमान शाहुजीराजे कृतानेक दंडवत विज्ञति. येथील कुशल भाद्रपद शुद्ध तृतीया, सौम्यवार स्वामींचे आशीर्वादें यथास्थित असों विशेष. सांप्रत स्वामींचें आशीर्वादपत्र येऊन परामृष होत नाहीं याकरितां चित्त साक्षेपित असे. तरि सर्वदां आशीर्वादपत्र पाठवून चित्त सानंदित केलें पाहिजे हे विनंति. - १ लेखांक ७ व ८ हीं दोन पत्रे काव्येतिहाससंग्रहांतील “पत्रे यादी वगैरे” मध्ये प्रसिद्ध झाली आहेत.