पान:श्री महापुरुष ब्रह्मेंद्रस्वामी धावडशीकर.pdf/१५३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

पना. जेष्ट बहुल त्रयोदशीपावेतों आशीर्वादेंकरून यथास्थित असे विशेष. आज्ञापत्र आले त्यांत कित्येक प्रकारें लिहिलें तें कळले. आंग्रे यांजविषयींचा मजकूर लिहिला, त्यास त्याजकडे मुद्दाम जासूद पाठवून आणवितों. राजश्री रघोजीराव भोंसले यांजकडून व होळकर यांजकडून पूजा वगैरे आ ह्मणोन लिहिलें तें नीट जाहलें. हा मृत्युलोक, मानवाचा भरंवसा आहे असें नाहीं ह्मणोन वगैरे उदासीने लिहिलें, त्यास आपण ईश्वर, जें कर- तील तें होईल. गांव सिव पैका मिळविला यास धनी कोण असें बहुत- प्रकारें लिहून आलें. त्यास लिहावयाचें कारण काय ? मुळींच जगन्नाथ- पंत याचें पुत्रवत् रक्षण केलें. तेव्हां तो धनी व आह्मां सर्वोस गुरु याप्रमाणे आज्ञा जाहली आहे. त्याप्रमाणें जगन्नाथपंत याचे पुत्रपौत्रादि वंशपरंपरा आह्मी व आमचे वंशांत जे होतील ते चालवितील. यांत अंतर होणार नाहीं. हें कळले पाहिजे. शालजोडी १ एक व बनात १ एक व मोहोरा १०० येणेंप्रमाणें पाठविलें आहे. हे कृपा करून घेतलें पाहिजे. बहुत काय लिहिणें हे विनंति [ लेखांक ६ ] श्री. श्रीसकलतीर्थरूप श्रीमत् परमहंस श्रीस्वामींचे सेवेसीः- अपत्यसमान शाहुजी राजे कृतानेक दंडवत विनंति. येथील कुशल कार्तिक शुद्ध द्वितीया स्वामींचे आशीर्वादें यथास्थित असे विशेष. आपण घोडेविसीं लिहिलें होतें त्यावरून हल्लीं घोडे चार पाठविले ● - १ स्वामींस आपला अंतकाळ अगोदर समजला असून त्यांनी शाहू महारा- जांजवळ व आपल्या पदरच्या लोकांजवळ तशा अर्थाचे उद्गार वारंवार काढिले होते. स्वामी इ. स. १७४५ मध्ये समाधिस्थ झाले त्यापूर्वीचें हे पत्र असावें. ● २ जगन्नाथपंत:- हे चिमणाजी कृष्ण भागवत यांचे चिरंजीव. स्वामींचे मुख्य कारभारी.