पान:श्री महापुरुष ब्रह्मेंद्रस्वामी धावडशीकर.pdf/१५२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

करावी, त्यास दुसरा कोणी मुजाहिम होईल ऐसें नाहीं. पाटिलास तंबी केल्याविना बलखुद राहतात असें नाहीं. कुणबी हरामजादे, त्यांस तंबी पोहोंचवून विचारेंच राखिले पाहिजेत, तरीच सुरळीत वर्ततील. स्वामींपेक्षां कुणब्याचें आवश्यक आहे असें नाहीं. हा अर्थ विस्तारें ल्याहावा तरी स्वामींस आमचें हृद्गत अविदित असें काय आहे ? जैसे कळेल तैसें कुणबी यास बलखुद ठेवून सुरळीत वर्तवावें विदित होय. सेवेसी श्रुत होय हे विनंति. [ लेखांक ४ ] श्री. - श्रीसकल तीर्थस्वरूप श्रीमत् परमहंस श्रीस्वामींचे सेवेसी:- अपत्यसमान शाहुजी राजे कृतानेक दंडवत विज्ञति स्वामींचे आ शीर्वादें कार्तिक बहुल सप्तमी मंदवासर यथास्थित असे विशेष स्वा- मींनीं आशीर्वादपत्र पाठविलें. पाहून समाधान झाले. तेथें आज्ञा जे, कृष्णंभट देसाई ता. राजापूर याचे वादी याणें यासीं वतनाचा कथला केला तो पूर्वार्थ मनास न आणितां राजश्री कान्होजी आंग्रे यांणीं वादी यास विभागपत्रे करून दिलीं याजपासीं या फर्मान व थोरले कैलासवासी महाराजांची पत्रे आहेत त्यांवरून सखोजी आंग्रे सरखेल यांणीं आपलीं पत्रे दिलीं. महाराजांनीं आपलीं पत्रे करून द्यावीं, ह्मणून लिहिलें. तरी त्यास हुजूर पाठवावें. मनास आणून आशा करणें ते केली जाईल. विदित होय हे विनंति. [ लेखांक ५ ] श्री. तीर्थरूप परमहंस श्री स्वामी वडिलांचे सेवेसी:- अपत्य शाहूनें त्रिकाल चरणीं मस्तक ठेऊन शिरसाष्टांग दंडवत विज्ञा- - १ कान्होजी आंग्रे – कारकीर्द ३० स० १६८० पासून इ० स० १७२९ पर्यंत. - २ सखोजी आंग्रे – कान्होजीचे वडील पुत्र ह्यांस सरखेल पदाची वस्त्रे इ. - स. १७२९ त झाली. परंतु ते लवकरच वारले.