पान:श्री महापुरुष ब्रह्मेंद्रस्वामी धावडशीकर.pdf/१५१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

३ पट्टी रुपये तीनसें साठ घेतले, आणीक इनामपट्टी आठसें रुपये घेणार झणून लिहिलें. ऐसीयास पहिले चव्हाणपट्टीचा पैका घेतला तो स्वामींस विदित झाला नाहीं. विदित होतें ह्मणजे मना केलें असतें. हल्लीं इनामपट्टीचा ऐवज न घ्यावयाची आज्ञा करून मना केलें असे. श्रीस गांव दिल्हें असतां दुसरा उपसर्ग लागेल असें काय आहे ? कित्येक वृत्त वेदमूर्ति राजश्री सदाशिवभट अग्निहोत्री सेवेसी निवेदितील त्यावरून विदित होईल. सेवेसी श्रुत होय सेवेस विनंति. श्री. [ लेखांक ३] श्री सकल तीर्थरूप श्रीमत्परमहंस श्री स्वामींचे सेवेसी:- अपत्यसमान शाहुजी राजे कृतानेक दंडवत विनंति येथील कुशल पौष वद्य ५ भोमवासरे स्वामींचे आशीर्वाीदें यथास्थित असे विशेष. स्वामींनीं आशीर्वादपत्र पाठविलें. पावून लेखनार्थ अवगत जाहला. तेथें आज्ञा जे, मौजे वीरमाडीकर पाटील हरामजादगी करितात, मसाला दोनशें रुपये माफ केला तीं पत्रे मागतात, कमाविसदार नको ह्मणतात, ऐशास तो गांव घेऊन दुसरा गांव द्यावा ह्मणोन, तर स्वामींस गांव दत्त करून दिल्हा तो माघारा घेणें ऐसें होईल की काय? गांवकरी पाटील हरामजादगी करितात त्यास आपण कळेल त्याप्रमाणें तंबी - तो पुढे फार प्रमत्त होऊन त्यानें बत्तीसशिराळ्यांची गढी काबीज केली आणि त्या प्रांतामध्ये फार दंगा मांडला. त्याचें सामर्थ्य विशेष जाणून शाहू महाराजांनीं त्याजबरोबर तह केला व त्यास शिराळें व कराड येथील चौथाईचे हक्क दिले. तथापि त्यानें आपली पुंडाई तशीच चालवून गांवोगांवीं चव्हाणचौथाई घेण्याचा सपाटा चालविला. त्यास कोल्हापुरच्या संभाजीराजाचें सहाय्य होतें. इ० स० १७२९ मध्ये शाहूनें प्रतिनिधीस त्याजवर पाठवून त्याचा व संभाजीचा अगदीं पराभव केला. उदाजी चव्हाणानें जी चव्हाणपट्टी बसविली होती ती पुढें कांहीं दिवस चालली असावी असे दिसतें.