पान:श्री महापुरुष ब्रह्मेंद्रस्वामी धावडशीकर.pdf/१५०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२ निवार करितात. ऐसीयास कोंकणप्रांत त्योग करून येथें आलों. येथें हे उपद्रव करितात. त्यामुळे आपले राहणें होत नाहीं झणून चित्तांत उदासीनता आणून विशेष खेद केला; त्यावरून राजश्री यमाजी शि- वदेव व भवानी शंकर यांस स्वमुखे रुबरु आज्ञा करणें ते केली. या उपरी त्यांकडून कांहीं उपसर्ग होणार नाहीं. स्वामींनी चित्त स्वस्थ करावें. उदासीनता सर्वथा न आणावी. स्वामींपेक्षां दुसरें अधिकोत्तर आहे असें नाहीं. स्वामी देवालयें, वापी, कूप, तटाकें झाडझडोरा ला- वितात हे कीर्ति अक्षय करीजेती. यापेक्षां उत्तम काय आहे ? आह्मांस ह्या गोष्टीचा बहुतसा संतोष आहे. स्वामींनी अननासें व केवड्याचे रोप पाठविले तेही पावले. वरकड विचार लिहिला तर जे होणें तें स्वामींच्या आशीर्वादप्रतापें होईल. ते गोष्टीचें अगाध आहे असें नाहीं. सेवेसी श्रुत होय हे विज्ञापना. २ [ लेखांक २] श्री. श्री सकल तीर्थस्वरूप श्री परमहंस श्री स्वामींचे सेवेसी :- अपत्यें शाहूजी राजे कृतानेक दंडवत विज्ञप्ति. येथील कुशल वैशाख शुद्ध द्वितीया सौम्यवासर स्वामींच्या आशीर्वादें यथास्थित असे विशेष. स्वामींनी आशीर्वादपत्र प्रेषिलें तेथें आज्ञा जे, श्रीस आपण धारादत्त कुलबाब कुलकानु गांव इनाम दिल्हे असतां राजश्री प्रतिनिधि चव्हाण- - १ कोंकणप्रांत त्याग करून स्वामीमहाराज देशीं सन खमस अशरीनांत आले असे काव्येतिहाससंग्रहांतील ब्रह्मद्र स्वामींच्या चरित्रांत लिहिले आहे त्या- वरून हे पत्र इ. स. १७२४-२५ च्या सुमाराचें असावें असे दिसतें. २ स्वामींस लोकोपकारार्थ देवालयें, विहिरी, तलाव बांधण्याचा व फुलझाडें व फळझार्डे यांचे बाग करण्याचा फार नाद असे. ३ चव्हाणपट्टी ही उदाजी चव्हाणानें बसविली होती. उदाजी चव्हाण हा अथणीचा राहणारा असून रामचंद्रपंत अमात्य ह्यांच्या हाताखालीं वाढला होता.