पान:श्री महापुरुष ब्रह्मेंद्रस्वामी धावडशीकर.pdf/१४९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

श्री महापुरुष ब्रह्मद्रस्वामी धावडशीकर यांचा पत्रव्यवहार. ०५०८ स्वामींस आलेलीं पत्रे. शाहूमहाराज. श्री. [लेखांक १ ] श्रीसकल तीर्थस्वरूप श्रीमत् परमहंस श्रीस्वामींचे सेवेसी:- अपत्यसमान शाहुजी राजे कृतानेक दंडवत विनंति. येथील कुशल स्वामींचे कृपाकटाक्षे यथास्थित असे विशेष स्वामींनीं सदय होऊन आशीर्वादपत्र पाठविलें प्रविष्ट होऊन अक्षरशः अभिप्राय विदित जाला. वीरैमाडे, अनेवाडी, धावडशी, येथें बावाजी शिवदेव व रा- जश्री यमाजी शिवदेव व भवानी शंकर हे वेठबिगारीचा उपद्रव अ - १ वीरमाडे, अनेवाडी व धावडशी हीं गांवें सातायाजवळ पांच सहा मै- लांचे अंतरावर असून स्वामींच्या देवस्थानाकडे इनाम चालत आहेत. मराठी राज्याचे वेळीं धावडशी है परळी तर्फाखालीं मोडत असे. वीरमाडे वाई हवेली- मध्यें असे, व अनेवाडी प्रांत व्याघ्रगड तर्फ कुडाळ असे मोडत असे. ह्या तिन्ही ठिकाणीं स्वामींच्या वेळचीं कांहीं स्मारकें आहेत. धावडशी येथें स्वामींची समाधि व भार्गवरामाचे देवालय फार प्रसिद्ध आहे. येथेंच स्वामींनी कोंकण प्रांतांतून आल्यानंतर प्रथम वास केला. २ यमाजी शिवदेव मुतालीक असावेत.