पान:श्री महापुरुष ब्रह्मेंद्रस्वामी धावडशीकर.pdf/१४८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

धावडशी संस्थानचे कारभारी जगन्नाथ चिमणाजी हे इ० स० १७८२ मध्यें मृत्यु पावले. नंतर त्यांच्या सरळ वंशजाकडे हें संस्थान चालले आहे. सांप्रतचे वहिवाटदार गंगाधर भिकाजी भागवतं हे आहेत. संस्थानांमध्यें स्वामींच्या सर्व कारकूनमंडळीचे वंशज अद्यापि आपापल्या वृत्तींचा उपभोग घेत आहेत. त्या सर्वांचा योग्य रीतीनें परामर्ष घेऊन व स्वामींची योग्यता व कर्तृत्वशक्ति सदैव लक्षांत ठेवून, त्यांचा कीर्तिघोष सर्व महाराष्ट्रांत यावश्चंद्र दिवाकरौ गर्जत राहील असें वर्तन ठेवणें त्यांकडे आहे. इतकें सांगून व स्वामींच्या समाधीस अनन्य भावें प्रणाम करून हा चरित्रग्रंथ येथें समाप्त करितों. ●