पान:श्री महापुरुष ब्रह्मेंद्रस्वामी धावडशीकर.pdf/१४७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१३४ , तो गडावर मातुश्रीकडे जाऊन, नानाप्रकारचे खेळ खेळोन, गोसावी याची उभा रणी करावितो. गोसावी यांसी वस्त्रे देऊन आठा चौ दिवशीं या स्थलास पाठविणार, ऐसें वर्तमान तहकीक ऐकिलें. तो गोसावी मागें दोन चार महिने होता. त्याणे नानाप्रकारच्या उपाधी केल्या. राजश्रीपर्यंत जाहलें. राजद्वारीं फजीत पावला. हे सर्व वर्तमान स्वामींसही विदित आहे. गुदस्तां पुण्यास मातुश्री होती. ते समयीं राजश्री बाजीराऊ अमात्य यांहीं ह्याचा अगत्यवाद धरिला होता. हें वर्तमान स्वामीस कळल्यावर स्वामीनें नशेद करून तेथून घालविला. तो मागतीं हा प्रसंग साधून आठां चौ दिवशीं या स्थलास यावें ऐसा करार जाहला आहे. तरी तो गोसावी या स्थानास आल्यानंतर येथें दहा वीस ब्राम्हण, बहुत कालीं श्रीचे पदरचे, व जुर्नी माणसें शें दोनशें आहेत. यांणीं देशत्याग करावा, ऐसा प्रसंग जाहला ! आह्मी लोकीं त्या गोसाव्याचे हाता- खालीं राहावें ऐसा प्रसंग मागेच राहिला नाहीं. याज उपरीं स्वामी मायबाप गणगोत. श्री मांगें आह्मांस दुसरे पाय आहेत असा अर्थ नाहीं साभिमानी स्वामी आहेत. आह्मीं काय विचार करावा ते आज्ञा करणार वडील स्वामी आहेत. बहुत काय लिहावें. सेवेसी श्रुत व्हावें ही विज्ञापना.” , , , . हे पत्र गेल्यानंतर पेशव्यांनी पुढे काय व्यवस्था केली ते समजत नाहीं. तथापि पुढे ह्या गोसाव्याचें नांव कागदपत्रांत कोठें दिसत नाहीं. त्याअर्थी हैं प्रकरण कसें तरी विझलें असावे असे दिसते. ह्यानंतर बाळाजी बाजीराव पेशव्यांनीं इ० स० १७५८ सालीं धावडशी संस्थानचे हिशेब घेऊन त्याच्या शिलकेंतून १२७१०।। रुपये वड्थ येथील शकुंतेश्वराच्या देवालयास दिले व स्वामींच्या कारकूनमंडळींस व समाधीच्या ख चीस ठरीव नेमणुका बांधून देऊन एक बेहेडा तयार करून दिला. नंतर पुनः थोरले माधवराव पेशवे ह्यांनीं इ० स० १७६६ सालीं दुसरा बेहेडा करून दिला. त्याप्रमाणे अद्यापि व्यवस्था चालत आहे. कोकणांतील पेढें येथील परशुराम व गोठणे येथील भार्गवराम ह्या स्वामींच्या देवस्थानांत पेशव्यांनी फारच घोटाळा केला व तीं निरनिराळ्या लोकांकडे चालविलीं. ह्या सर्वोचा पुढील वृत्तांत अत्यंत भानगडीचा व वादग्रस्त असल्यामुळे तो स्वामींच्या पवित्र चरित्रांत दाखल करण्याची आमची इच्छा नाहीं.