पान:श्री महापुरुष ब्रह्मेंद्रस्वामी धावडशीकर.pdf/१४६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१३३ श्री भार्गवराम. “श्रीमंत तीर्थस्वरूप राजश्री नाना व राजश्री भाऊ स्वामींचे सेवेसी- अपत्येसमान जगन्नाथ चिमणाजी मुक्काम धावडशी कृतानेक साष्टांग नम- स्कार विनंति तागाईत छ० १५ जिल्कादपर्यंत स्वामींचे कृपेंकरून वर्तमान यथास्थित असे विशेष. स्वामींची आज्ञा घेऊन धावडसीस आलों. ते समयीं स्वामीनें आज्ञा केली कीं दसरा करून मागती पुण्यास येणे. त्यास घरीं नवरात्र झालें. दसरा जहाला. उपरांतिक निघोन यावें तों, सातारा गडावरून वर्तमान आलें कीं, मागें येथें गोसावी राहिला होता, त्याणें मातुश्री आईसाहेबांकडेस संधान करून आपली स्थापना या स्थलीं करावी ह्मणोन मध्यस्थ घातलें. मागें धावडसीस एक शिंपी होता, तो त्या गोसावियास सामील जाहला आहे. - भिक्षा द्यावी अशीं पत्रे पाठविल्याचाही आधार सांपडतो. मल्हारराव होळकराचें पुढील पत्र वाचले असतां ह्याची साक्ष पटेल. “राजश्री पंतप्रधान साहेबांचे सेवेसी . श्रीमंत सकलगुणालंकरण अखंडित लक्ष्मीअलंकृत राजमान्य आज्ञाधारक मल्हारजी होळकर दंडवत, विज्ञापना येथील क्षेम ता० छ० २२ सवाल पा वेतों मु० वाफगांव स्वामींच्या कृपावलोकन करून सेवकाचे वर्तमान यथास्थित असे विशेष स्वामींहीं पत्र पाठविलें. तेथें आज्ञाः - श्री भार्गवराम बावा स्वामींचे वार्षिक तुह्मांकडे असेल. त्याप्रमाणे त्यांची माणसें येतील, त्यांजवळ देणें. पुढे श्रीचे शिष्य श्री अद्वैतेंद्र येतील त्यांचा बहुमान करणे ह्मणून आज्ञा. त्यास प्रस्तुत श्रीकडून रा० केसोपंत आले. त्यांजसमागमें आज्ञेप्रमाणे सविस्तर अर्थ निवेदिला आहे. त्याप्रमाणे श्रीचे सेवेसी विदित होईल. पुढे स्वामींचें आगमन होईल त्यासमयीं बहुमानास सेवकापासून अंतराय होणार नाहीं. सेवेसी श्रुत होय हे विज्ञापना.” ह्याचप्रमाणे पवार वगैरेंचीं पत्रे सांपडली आहेत. हा अद्वैतेंद्र गोसाव्याचा समग्र वृत्तांत प्रसिद्ध झाला तर पेशव्यांच्या ह्या अद्वितीय कृतीचें खरें स्वरूप व्यक्त होईल. ह्या उपलब्ध झालेल्या पत्रांवरून तर पेशव्यांच्या कीर्तीस कलंक लागल्यावांचून राहणार नाहीं !