पान:श्री महापुरुष ब्रह्मेंद्रस्वामी धावडशीकर.pdf/१४५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१३२ ● • . होतों. परंतु कांहीं साहित्य नाहीं. व कांहीं व्यासंगदुःख ह्मणून विनंतिपत्र पाठविलें आहे. तर स्वामींचें संस्थान आज्ञेप्रमाणे वर्तणूक करूं. स्वामीजवळ विनंति केली, तिचा परिणाम लावणार स्वामी समर्थ आहेत. रा० विष्णुपंत अद्यापि निकालावर येऊन श्रीचे रुपये देत नाहींत. ते रुपये स्वामींचे व संस्थान स्वामीवांचून दुसरा कोण चालविणार ? आह्मी आज्ञांकित असों कारखाना उपाशी मरतो. तीन चार महिने लोकांस रोजमुरा नाहीं. विश्वासघात विष्णु- पंतानें केला. काम निम्में राहिले. आमचा उपाय जे स्वामींस विनंति करावी. भिक्षेचा रुपया श्रीस्वामींनी कोणाप्रकारें मिळविला; व आपणच त्याचें रूप करून वृद्धि केली जे, सत्कारणीं व्यय होईल. तें द्रव्य मध्येंच राहून काम पडलें! याची आज्ञा करणार आपण वडील आहेत. सोमाजी विनंति करितां विदित होईल. कृपावृद्धि केली पाहिजे. श्रीचे समाधीस गळेफांस व प्रावर्ण बादलीवस्त्र असावें. पुण्यतिथीचें सामान कांहीं आज्ञा करून देवावें. ही विज्ञापना. " ह्यानंतर पेशव्यांनीं कांहीं ताकिदी करून व खर्चास थोडासा ऐवज वगैरे पाठवून कशीतरी व्यवस्था केली. परंतु ह्यापुढे केव्हांही धावडशी संस्थानांत बिलकूल स्वास्थ्य राहिले नाहीं. शाहुमहाराज निवर्तल्यानंतर सातान्यास जी गडबड झाली, त्या गडबडी- मध्यें कोणी अद्वैतेंद्र गोसावी नामक एक इसम पुढे आला; व त्यानें ताराबाईस अनुकूल करून घेऊन धावडशी संस्थानाचें स्वामित्व आपल्याकडे घेण्याचा यत्न केला. ह्या गोसाव्याची माहिती स्वामींच्या बखरींत प्रसिद्ध झालेली नाहीं. परंतु कित्येक कागदपत्रांत त्याचा उल्लेख सांपडतो. त्यानें ताराबाईकडून व पेशव्यांकडून सर्व सरदारांस पत्र लिहवून धावडशी संस्थानाची भिक्षा व वसूल आपणांस मिळावा असा यत्न केला होता. त्यामुळे जगन्नाथ चिमणाजी परम कष्टी झाले व त्यांनी पेशव्यांस एक विनंतिपत्र पाठविले. ते येणेप्रमाणेः- - १ पेशव्यांचे ह्या गोसाव्यास आंतून अंग होते व त्यांनी होळकर पवार वगैरे सरदारांस या अद्वैतेंद्र गोसाव्यास धावडशी संस्थानचा शिष्य समजून