पान:श्री महापुरुष ब्रह्मेंद्रस्वामी धावडशीकर.pdf/१४४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१३१ • श्री भार्गवराम. “श्रीमंत राजश्री भाऊ स्वामींचे सेवेसी:- विनंति सेवक जगन्नाथ चिमणाजी मुक्काम धावडशी कृतानेक साष्टांग नमस्कार विनंति येथील क्षेम तागाईत आषाढ बहुल पंचमीपर्यंत वर्तमान यथास्थित असे विशेष बहुत दिवस स्वामीकडील पत्र येऊन परामर्ष होत नाहीं. ऐसें नसावें. सदैव कृपा करून पत्रों सांभाळ करणार स्वामी वडील आ- हेत. वरकड, श्रीची पुण्यतिथी श्रावणमासी शुद्धपक्षी प्रथम दिवसापासून नवमी पर्यंत होत असते. ऐशास आजिपर्यंत श्रीमंत सौभाग्यवती मातुश्री बाईसाहेब होती, ती सर्व साहित्य करीत होती. तो विचार यंदा राहिला. या जउपरी, आपण श्रीचे शिष्य समर्थ आहेत. याजउपरी, आपण पुण्यतिथीचें साहित्य उत्तम प्रकारें करून महोत्साह शोभिरंत करावा. आह्मांस आपण वडील आहेत. आज्ञा होईल तेणेप्रमाणे वर्तणूक करूं. स्वामीस कोणे गोष्टीचें अशक्य आहे ऐसें नाहीं. सहजामध्ये होऊन येईल. सोमाजी सेवेसीं विनंति करील तेणेंप्रमाणे अनुकूलता करावी. किनखाप गुदस्ताप्रमाणे उत्तम गळेफांस देविला पाहिजे; व वार्षिक ऐवजाची आज्ञा सातारा घ्यावयाची करावी. ह्मणजे मुदतीस पावतां होईल. बहुत काय लिहावें. कृपा करावी ही विनंति.” , - हें पत्र शाहु महाराजांची राणी सगुणाबाई वारल्यानंतर लिहिले असावें असे दिसते. ह्यानंतर शाहु महाराज वारल्यानंतर दुसरे पत्र लिहिले आहे तें येणेंप्रमाणेः - - श्री भार्गवराम. “श्रीमंत राजश्री भाऊ स्वामींचे विनंति सेवक जगन्नाथ चिमणाजी, कृतानेक साष्टांग नमस्कार विनंति येथील कुशल तागाईत आषाढ शुद्ध दशमी पावेतों, स्वामींचे कृपेनें यथास्थित असे विशेष. श्री स्वामींची पुण्यतिथी श्रावण शुद्ध नवमीस प्रतिपदेपासून नवमीपावेतों, कीर्तन व संतर्पण सांप्रदाय पांच वर्षे वार्षिक चालला. आज- पावेतों पुण्यतिथीस साहित्य राजश्री छत्रपती स्वामीकडून होत होतें वार्षिक टाकितां नये. करावें तों, सामर्थ्य स्वामींस विदितच आहे. मीच सेवेसीं येत सेवेसीं: — -