पान:श्री महापुरुष ब्रह्मेंद्रस्वामी धावडशीकर.pdf/१४३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१३० केलांत नाहीं ! हें उचित कीं काय ? तेथें श्रीचें अधिष्ठान आहे. त्यावर शिव- भट ह्मणून एक ब्राह्मण ठेविला आहे, ह्मणून विदित जाहलें. हे गोष्ट उचित न केली. तरी परशरामीं श्रीनीं कितीक श्रम साहस करून बागा, बागशाही व इमारती केल्या, हें साद्यंत स्वामींस विदित आहे. ऐसे असोन तेथे दुसरा ब्राह्मण ठेवावा हे कोण नीत? हे गोष्ट स्वामींस मानत नाहीं. त्यामागें सर्व संपदा श्रीची जाणून, कोंकणांतील गांव श्रीचेकडे सुदामतप्रमाणे चालवावयाची आज्ञा करून, हल्दीं हैं आज्ञापत्र तुझांस सादर केले असे. पेशजीपासून गांव चालत आले आहेत. वितपशीलः- १ मौजे पेढे, तालुके चिपळूण १ मौजे नायसी ता॥ सांबर्डे १ मौजे कळंबुसी १ मौजे गोठणें, तालुके राजापुर - १ मौजे आंबडस, तालुके खेड १ मौजे डोरलें ता॥ पांवस १ मौजे माहाकुंगे. एकूण हे सात गांव पूर्वीपासून चालत आले आहेत. त्याप्रमाणें ताकिदी देऊन चालवणे. देहाय मजकुरांस हबशीपट्टी वगैरे उपसर्ग काडीमात्र लागू न देणें. तुमच्या वडिलांची निष्ठा होती त्याप्रमाणे तुझीं धरून चालवावयासी अंतर न करणे. यासी तकरार कराल हैं उचित नाहीं. जाणिजे रवाना छ० ९ माहे सावान, सुहुर सन सीत आर्बेन मया आलफ. ● (स्वदस्तुर लेख) “सुदामतप्रमाणे चालवून करार न होय. पारिपत्य हुजुरहून होईल. सुज्ञ असा.” केलियास उचित न हैं आज्ञापत्र वाचलें ह्मणजे शाहु महाराजांस स्वामींच्या पश्चात् देखील त्यांच्या देवस्थानाचें किती अगत्य होते हैं चांगले दिसून येते. परंतु हे अगत्य पुढे राहिले नाहीं. शाहु महाराज निवर्तल्यावर धावडशी संस्थानाचा वसूल सुर- •ळीत येईनासा झाला. त्यामुळे स्वामींच्या वार्षिक पुण्यतिथीच्या खर्चाप्रीत्यर्थ देखील पेशव्यांजवळ याचना करण्याचा प्रसंग येऊन ठेपला संस्थानचे कार- भारी जगन्नाथ चिमणाजी ह्यांची पेशव्यांस लिहिलेलीं एकदोन पत्रे उपलब्ध झाली आहेत, त्यावरून ह्या ह्मणण्यास पुष्टि येते. तीं पत्रे येणेप्रमाणे :- -