पान:श्री महापुरुष ब्रह्मेंद्रस्वामी धावडशीकर.pdf/१४२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१२९ शाहू नृपाल भजतो निजपूर्ण भावें ॥ सर्वत्र लोक भजती बहुपूर्ण भावें ॥ ३ ॥ तयाचा जगन्नाथ भक्त प्रशील ॥ समाधि स्थळ बांधिलें हें सुनील ॥ महा बुद्धिनें योजिला जो सुशिल्पी ॥ तया शंकरें बांधिलें आत्मकल्पीं ॥ ४ ॥ शके १६७२ प्रमोदनाम संवत्सरे. ह्याप्रमाणें स्वामींचें देवालय तयार झाल्यानंतर स्वामींचें उपास्य दैवत श्री भार्गवराम ह्याची पाषाणाची मूर्ति पेशवाईतील प्रख्यात कारागीर बखतराम याजकडून पुणे येथे तयार करवून बाळाजी बाजीराव पेशवे ह्यांनी पाठविली. व एक गणपतीची मूर्तिही पाठविली. त्यांची संस्थापना स्वामींच्या समाधिस्था- नासन्निध केली आहे. त्यामुळे देवालयास विशेष शोभा येऊन ते फार रम्य व हत्तापहर स्थान झालें आहे. ● शाहु महाराज व सगुणाबाई वारल्यानंतर धावडशी संस्थानाचा योग्य अ- भिमान व अगत्य पेशव्यांनीं विशेष बाळगल्याचे दिसत नाहीं. शाहु महा- राज होते, तोपर्यंत देवस्थानाच्या थाटांत कांहीं उणे पडले नाहीं. स्वामी नारायणस्वरूपी झाल्यानंतर त्यांच्या पश्चात् आंग्रे वगैरे बेलगामी सरदार स्वा मींच्या कोकणांतील गांवांस उपद्रव देऊं लागले. हें वर्तमान महाराजांस कळतांच, त्यांनी स्वदस्तुर आज्ञापत्र पाठवून त्यांस सक्त ताकीद केली. हें आज्ञा- पत्र येणेंप्रमाणेः— , - “राजमान्य राजश्री तुळाजी आंग्रे सरखेल यांसी आज्ञा केली ऐसीजे:- श्री परमहंस थोर तपस्वी त्यास सांप्रत ते शांत जाहले. त्यांचें आवश्यक स्वामींस विशेषात्कारें होतें. त्यांचें अधिष्ठान पूर्वीपेक्षां अधिकोत्तर चालवावें हैं स्वामींस अगत्य. ते कांहीं सामान्य होते ऐसें नाहीं. निष्ठा श्रीच्या ठायीं बहुत होती. त्यांचीही ममता त्यांचे तुमच्या वडिलांची - • ठायीं असून तुमचे ठायीं बहुतसी होती. ऐसे असून या समयीं तुझीं त्यांचा कांहींच परामर्ष