पान:श्री महापुरुष ब्रह्मेंद्रस्वामी धावडशीकर.pdf/१४१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१२८ येथील देवालयाचे कामावरील शिल्पकलाचतुर गौंडी संभाजीनाईक व व्यं- काजीनाईक ह्यांस आणवून सुमुहूर्तावर देवालयास प्रारंभ केला. खासे महा- राज व राणीसाहेब वारंवार येऊन कारखान्यावर देखरेख ठेवूं लागले व लो- कांचा परामर्ष घेऊं लागले. त्यामुळे देवालयाचें काम उत्कृष्ट रीतीनें चालू झालें. परंतु दुर्दैवानें मध्यंतरींच राणी सगुणाबाई ह्यांस क्षयाची भावना होऊन त्या ता० २५ आगस्ट ३० स० १७४८ रोज मृत्यु पावल्या व महाराजांची प्रकृतीही उदासीन झाली. त्यामुळे हे देवालयाचें काम त्यांच्या डोळ्यांदेखत पूर्ण झाले नाहीं. शाहु महाराज ता० १५ डिसेंबर इ० स० १९७४९ रोजी मृत्यु पावले. व हें देवालय इ० स० १७५८ सालीं परिपूर्ण झाले. ह्या देवालयास एकंदर खर्च ११९३५३४-।। रुपये लागला. देवालयाचें काम संपूर्ण झाल्यानंतर शंकराजी गौंडी ह्यांस ३४५ रुपयांचे सोन्याचें कड़ें व ७० रुपयांचा रुप्याचा गज बक्षीस देण्यांत आला, व इतर पाथरवट गौंडी वगैरे लोकांस १४५५॥ रुपयांचीं इनामें दिलीं.' हें देवालय फार प्रेक्षणीय झालें आहे. ह्या देवालयाच्या महाद्वाराच्या शिरोभागीं शंकराजीनाईक ह्यांनी पुढील लेख कोरून ठेविला आहेः - श्री भार्गवराम. श्री भार्गवाचा अवतार साचा ॥ ब्रह्मद्रस्वामी बहुतां दिसांचा ॥ अवतार त्याचा समाप्त झाला ॥ संवत्सरा जाणही क्रोधनाला ॥ १ ॥ श्रावण शुक्ल नवमी भृगुवार होता ॥ अरुणोदई प्राण प्रयाण होतां ॥ कृष्णातिरीं मुख्य समाधिस्थानं ॥ वैकुंठवास मुनिला बहु लोक मानी ॥ २ ॥ प्रारंभ कामासि तयेचि कालीं ॥ वर्षे समाप्ती सहिशास्त्र झालीं ॥ १ ही माहिती देवालयाच्या हिशोबांत दाखल असून ती कै० नारोराम शेखदार ह्यांनी दिली.