पान:श्री महापुरुष ब्रह्मेंद्रस्वामी धावडशीकर.pdf/१४०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१२७ तांच ते स्वतःच्या लव्याजम्यासह कृष्णातटाकी आले व स्वामींचा गतासु देह पाहून अत्यंत शोकाक्रांत झाले. हां हां ह्मणतां कृष्णेच्या निर्जन वाळवंटांत प्रचंड जनसमुदाय जमला, व स्वामींच्या कलेवराचें दर्शन घेऊन ढळाढळां नेत्राथू ढाळूं लागला. त्या वेळचा तो भयंकर शोकरस वर्णन करण्यास कोण समर्थ आहे ? शाहुमहाराजांनी स्वामींचें कलेवर स्वतःचे पालखीत ठेविले व त्यावर भरजरी चादर घालून व त्यांची सुगंधी द्रव्यांनीं पूजा करून मोठ्या समारं- भानें ती पालखी धावडशी येथे आणली. तेथें स्वामींच्या स्नानसंध्येच्या पुण्यभूमीजवळ गर्ता तयार करून त्या कलेवराचे यथाविधि अंत्यउपचार केले. नंतर महाराजांनी स्वामींच्या सर्व सेवकजनांचें यथोचित समाधान करून, आपल्या सरदार लोकांस “महाराज गेले आणि स्वामी आहेत” असे समजोन सर्वांनीं पूर्ववत् निष्ठा धरून चालावें. वर्षासने पहिल्याप्र माणाने सर्वांनी द्यावीं. त्यांत अंतर करील त्यास शपथ असे. शिवाय पारिपत्य होईल” अशी ताकीद केली. नंतर स्वामींच्या समाधीचा व देवस्थानाचा उत्कृष्ट बंदोबस्त करून महाराज सातायास निघून गेले. पुढे तेरावे दिवशीं त्यांनीं पुनः धावडशीस येऊन तेथें ब्राह्मण संतर्पण करून व सर्व जातींच्या लोकांस प्रसादभोजन देऊन, स्वामींच्या पुण्यतिथीची चांगल्या रीतीनें सांगता केली. नंतर त्यांनी स्वामींचे वार्षिक उत्सव, देवाचे अभिषेक, नैवेद्य, नंदादीप, पूर्व- वत् प्रमाणें चालवून स्वामींचा पूर्वीचा डौल कायम राहावा ह्मणून जगन्नाथ चिमणाजी ह्यांस धावडशी संस्थानचे मुख्य कारभारी नेमिलें; आणि सर्व प्रका रची उत्तम व्यवस्था केली. शाहुमहाराजांप्रमाणे त्यांची राणी सगुणाबाई हिनेंही स्वामींविषयों तशीच भक्ति प्रदर्शित करून स्वामींची प्रतिवार्षिक पुण्यतिथि मोठ्या उत्सवानें चालविली. . स्वामीमहाराज समाधिस्थ झाल्यानंतर त्यांच्या समाधिस्थानावर भव्य देवा- लय बांधून त्यांच्या भव्यकीर्तीचें चिरस्मारक करावे असा छत्रपति शाहु महा- राज ह्यांनीं विचार केला. त्याप्रमाणे त्यांनी आपले खाजगी कारभारी विष्णु विश्वनाथ ह्यांस धावडशीस पाठवून जगन्नाथपंतांच्या विचारें तेथें प्रशस्त देवा- लय व भव्य सभामंडप बांधण्याचा बेत ठरविला. नंतर स्वामींचे भुलेश्वर