पान:श्री महापुरुष ब्रह्मेंद्रस्वामी धावडशीकर.pdf/१३९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१२६ व तेव्हांपासून त्यांनीं त्यांच्यावर अधिक बारकाईने लक्ष ठेविलें. राणी सगु- णाबाई हिनें स्वामींस कृष्णातीरीं वार्षिक समाधीस जाऊं नये ह्मणून आग्रहपूर्वक विनंति केली. परंतु स्वामी मृत्यूची पर्वा न करणारे असल्यामुळे त्यांनीं आपल्या नित्यकर्मात अंतर पडू दिले नाहीं. , , स्वामीमहाराज हे शके १६६० क्रोधननामसंवत्सरे ह्या वर्षाच्या श्रावणमहि- न्यांत, आपल्या प्रतिवार्षिक नियमाप्रमाणे, श्री कृष्णातीरीं समाधीस गेले. रीती- प्रमाणे जगन्नाथपंतांनीं त्यांच्या समाधीचं सर्व साहित्य करून दिलें, व दोन शिपाई समाधिस्थानाच्या रक्षणास ठेवून स्वामींचा निरोप घेतला. स्वामींनीं त्यांजबरोबर शाहु महाराजांस देण्याकरितां कांहीं प्रसाद फळे देऊन त्यांस निरोप दिला. जगन्नाथपंत तेथून परत आल्यानंतर सुमारें आठ दिवस स्वामी एकां- तामध्ये होते. नंतर नववे दिवशीं ते आकस्मिक बाहेर आले. व गुंफेतील दर्भासन बाहेर आणून, कृष्णास्त्रान करून, त्यावर येऊन ईश्वरस्मरण करीत बसले. समाधीचा पूर्ण काल न होतां स्वामी गुंफेतून बाहेर आले हैं पाहतांच द्वाररक्षकांस परमाचर्य वाटले. स्वामींनी त्यांस जगन्नाथपंतास आणण्याबद्दल आज्ञा केली; आणि आपण दर्भासनावर लांब मृगासन पसरून, एका शालेच्या पदरीं जपाची माळ बांधून, उशाकडे ठेविली; व शालजोडी पांघरून घेऊन श्री रामनामाचा उच्चार करीत निद्रा केली. मुखांतून राम राम असें नामस्मरण चाललें असतांनाच त्यांचे प्राण नारायणस्वरूपीं मिळाले. इकडे धावडशी येथें जगन्नाथपंत ह्यांस स्वामींचा निरोप पोहोंचतांच ते तांतडीनें कृष्णातीरीं धांऊन आले. तो स्वामीमहाराजांची मूर्ति समाधिस्थानांतून बाहेर येऊन निद्रि- स्त झालेली त्यांच्या दृष्टीस पडली. तेव्हां त्यांनीं दर्शनोत्सुकतेनें स्वामींच्या तोंडावरील शालेचा पदर काढून पाहिला. तो स्वामीमहाराज ब्रह्मीभूत झाले आहेत असे त्यांस क्ळून आले. मग त्यांच्या दुःखास पारावार काय विचारावा ? अखिल महाराष्ट्राचा सद्गुरु, सद्गुणांचा मूर्तिमंत अवतार, स्वरा- ज्याचा व स्वधर्माचा केवळ पंचप्राण, दुष्टांचा शासनकर्ता, सुष्टांचा संरक्षक, आणि दीनांचा त्राता असा सत्पुरुष इहलोकांतून गत झाल्यामुळे प्रत्येकाचें हृदय शोकरसाने भरून जाईल; मग प्रत्यक्ष पुत्रवत् पालन केलेल्या जगन्नाथपं- तांची ती काय स्थिति ? स्वामींची निधनवार्ता शाहु महाराजांच्या कानीं पड-