पान:श्री महापुरुष ब्रह्मेंद्रस्वामी धावडशीकर.pdf/१४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

लोक ह्यांच्या दप्तरांत सांपडण्यासारखी आहेत. सांप्रत जे कागद उपलब्ध झाले आहेत, ते स्वामींच्या चरित्राचे स्वरूप व त्या काळांतील इतिहासाची बरोबर दिशा दाखविण्यापुरतेच असल्यामुळे, त्यांवरून व्यक्त होणारें स्वामींचें चरित्र सारांशरूपानें दिले आहे; व उपलब्ध झालेल्या पत्रव्यवहारांपैकी ३० स० १७४५ पर्यंतचीं-ह्मणजे स्वामींच्या कारकीर्दीतलीं ऐतिहासिक महत्त्वाचीं पत्र स्वतंत्र रीतीनें दिलीं आहेत. सर्व पत्रव्यवहार संगतवार व शाबूद असा एके ठिकाणीं उपलब्ध न झाल्यामुळे, तो जसजसा मिळाला त्याप्रमाणे, त्याचे पुरवणीरूपाने दोन भाग करून, ते शेवटीं जोडिले आहेत. ह्याशिवाय स्वामीसंबंधाची किंवा स्वामींच्या राजकारणासंबंधाचीं जीं महत्त्वाची पत्रे उप- लब्ध झालीं, तीं सर्व स्वामींच्या चरित्रांत दाखल केली आहेत; व होतां होईल तितकें करून, ते चरित्र अस्सल पत्रांच्या साहाय्याने लिहिले आहे. स्वामींचा सर्व अनुपलब्ध व अश्रुतपूर्व असा हा चरित्रवृत्तांत अप्रसिद्ध कागद- पत्रांच्या साहाय्याने तयार करावयाचा असल्यामुळे त्यांत कांहीं दोष राहण्याचा संभव आहे. तथापि त्याबद्दल उदार व मर्मज्ञ वाचक कृपा करून क्षमा करतील अशी आशा आहे. इतिहासरूपी इमारत तयार करण्यास प्रारंभ केला ह्मणजे एकदम ती भव्य, सालंकृत व नेत्राल्हादक अशी होणें शक्य नाहीं. तिचें सर्व साहित्य अनुकूल झाले ह्मणजे ती सर्वांगसुंदर होईल, हें सुज्ञ वाचकांस सांगाव- यास नकोच आहे. , O , ह्या पुस्तकांत प्रसिद्ध झालेल्या पत्रव्यवहाराच्या आधारें, मराठ्यांच्या इतिहासा- विषयीं अभिमान व कळकळ बाळगणारे पार्शी गृहस्थ प्रो० करकरिया ह्यांनीं गेल्या वर्षी ह्मणजे ता० ५ डिसेंबर १८९९ रोजीं, मुंबई येथील रॉयल एशिया- टिक सोसायटीपुढे इंग्रजी भाषेमध्यें एक निबंध तयार करून वाचिला. त्याचा सारांश ता० १४ डिसेंबर इ० स० १८९९ च्या “Bombay Gazette" पत्रामध्ये प्रसिद्ध झाला आहे. ब्रह्मेद्रस्वामींची ही अनुपलब्ध नवी व मनोरंजक माहिती ऐकून युरोपियन लोकांस फार संतोष झाला. “रॉयल एशियाटिक सोसा- यटी" चे सेक्रेटरी रेव्ह० मि० ग्रे व डा० म्याकडोनल्ड ह्यांनी हा मनोरंजक पत्र- व्यवहार प्रसिद्ध करण्याबद्दल विशेष उत्तेजन दिलें. ह्याबद्दल ह्या सर्वांचे उपकार मानल्यावांचून आमच्यानें राहवत नाहीं. ब्रह्मद्रस्वामींच्या ह्या पत्रव्यवहाराचें