पान:श्री महापुरुष ब्रह्मेंद्रस्वामी धावडशीकर.pdf/१५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

ऐतिहासिक महत्त्व लक्षांत घेऊन, प्रो० करकरिया ह्यांनीं त्यांचे विशेष कौतुक केलें, व “रॉयल एशियाटिक सोसायटी" च्या नजरेस हा विषय आणिला, ह्याब- द्दल त्यांचेंही अभिनंदन करणे रास्त आहे. १० , ह्या ग्रंथाची सर्व सामग्री मिळवून देण्याचे काम व हा प्रसिद्ध करण्याचे काम आमच्या अनेक विद्वान्, रसिक, व इतिहासप्रिय मित्रांनीं साहाय्य केलें, ह्याबद्दल त्या सर्वांचे आभार प्रदर्शित करणे अवश्य आहे. किंबहुना, त्यांच्या कृपेनें, प्रोत्साहनानें, आणि सहानुभूतीनें हा ग्रंथ तयार झाला, असे ह्मणण्यास हरकत नाहीं. तथापि त्यांतल्या त्यांत, धावडशी संस्थानचे वहिवाटदार श्री० रा० रा० गंगाधर भिकाजी भागवत, बडोदें येथील “ सयाजीविजय” पत्राचे म्यानेजर रा० रा० अनंत नारायण शेखदार, पिंपरी येथील इनामदार श्री० रा० रा० कृष्णराव पांडुरंग ऊर्फ आपासाहेब भागवत, सातारच्या छत्रपतींचे माजी कारभारी रा० रा० आनंदराव बहिरव पिंगळे, व धावडशी संस्थानचे फडणीस रा० रा० दिनकर महादेव तांचे वगैरे सद्गृहस्थांचे व इंदूर येथील आमचे विद्वान् व इतिहासप्रिय मित्र श्री० सरदार माधवराव विनायकराव किबेसाहेब ह्यांचे बहुत बहुत उपकार आहेत, हे कृतज्ञ अंतःकरणाने येथे व्यक्त केल्यावांचून राहवत नाहीं. त्याचप्रमाणे हे पुस्तक प्रकाशित करण्याचे काम, पुणे येथील डेकन व्हर्नाक्युलर सोसायटी व तिचे विद्वान् अध्यक्ष डा० रामकृष्ण गोपाळ भांडारकर व उपाध्यक्ष नामदार न्यायमूर्ति महादेव गोविंद रानडे व सेक्रेटरी रा० सा० आत्माराम विनायक पाटकर ह्यांनीं विशेष प्रोत्साहन दिले, ह्याबद्दल त्यांचेही आभार प्रदर्शित करणं अवश्य आहे. शेवटीं “निर्णयसागर" छापखान्याचे मालक व आमचे सुशील मित्र रा० रा० तुकाराम जावजी शेट ह्यांच्या कृपासाहाय्याने हा ग्रंथ सुंदर रीतीनें छापला गेला, ह्याबद्दल त्यांचेही उपकार प्रदर्शित करून, ही अल्पशी प्रस्तावना येथें संपवितों. मुंबई...... } ता० १५-१२-१९० दत्तात्रय बळवंत पारसनीस.