पान:श्री महापुरुष ब्रह्मेंद्रस्वामी धावडशीकर.pdf/१३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

, , मराठी राज्याशी संबंध असून, त्याच्या उत्कर्षास त्यांचें अप्रत्यक्ष रीतीनें बहुत साहाय्य झाले आहे. मराठी राज्यामध्यें जेवढे ह्मणून थोर पुरुष निर्माण झाले, त्यांस उदयास आणण्यास कोणीतरी सत्पुरुष कारणीभूत झालेला आहे. राम- दासस्वामींखेरीज चिंचवडचे मोरया गोसावी, निगडीकर रंगनाथस्वामी, ब्रह्म- नाळचे आनंदमूर्ति, वडगांवकर जयरामस्वामी, शिखर शिंगणापूरचे संतोष- भारती गोसावी, केंजळचे केवळभारती गोसावी, पातोडचे देवभारती इत्यादि साधुसत्पुरुष प्रख्यात मराठे वीरांचे आणि मुत्सद्यांचे गुरु होते, व ही गुरुपरं- परा मराठी राज्य रसातळास जाईपर्यंत कायम होती. शेवटचे बाजीराव व बापू गोखले ह्यांचेही ठाकूरदास बावा ह्मणून महाराष्ट्रांतील एक प्रख्यात साधु व कीर्तनकार हे गुरु होते. परंतु कालमानानें ही गुरुपरंपरा मात्र कायम राहून तिच्यांतील अद्भुत् शक्ति तेवढी विलयास गेली. सत्पुरुषाच्या आशीर्वादाचा महिमा महाराष्ट्रीयांच्या मनावर इतका विंबला कीं, ते वाटेल त्या साधूस भजूं लागले. इतिहासप्रसिद्ध पराक्रमशाली योद्धे महादजी शिंदे ह्यांचा गुरु बीड येथील शाह मनसूर ह्मणून एक अवलिया फकीर होता. त्यानें त्यांस "जा, तुला दिल्लीपर्यंत राज्य दिले आहे" असा आशीर्वाद दिला होता. ह्या फकिरावर महादजींची इतकी भक्ति जडली होती कीं, त्यानीं त्याचा चेला हबीब शाह यास सदैव आपल्या स्वारीमध्ये ठेविलें होतें, व त्याचें ते प्रत्यहीं दर्शन घेत असत. ह्या उदाहरणावरून हिंदुधर्माच्या अंगीं सात्विकपणा फार असल्यामुळे हिंदुलोकांचीं मनें कशीं भाविक व भक्तिपूर्ण बनलीं होतीं है निदर्शनास येतें. तात्पर्य, ह्या गुरुपरंपरेचा इतिहास प्रसिद्ध झाला, तर महाराष्ट्रधर्माच्या स्वन्या स्वरूपाचें आवि प्करण होऊन त्याचें खरें तत्त्व व्यक्त होईल. ह्या सर्व साधुमंडळीची माहिती जेथे जेथें त्यांचे मठ किंवा देवस्थानें आहेत, तेथें तेथें शोध केला असतां सांप- डण्यासारखी आहे. , प्रस्तुत ग्रंथांत ब्रह्मद्रस्वामींचा महत्त्वाचा पत्रव्यवहार व त्यांचें संक्षिप्त चरित्र सादर केले आहे. परंतु तेवढ्यानें स्वामींचं चरित्र अथवा पत्रव्यवहार परिपूर्ण झाला, असें मानितां यावयाचें नाहीं. स्वामींच्या चळवळी अनंत असून, त्यांच्या राजकारणांचा पसारा उत्तर हिंदुस्थानांतील धारानगरीपासून दक्षिणेतील गुत्ती- पर्यंत होता. त्यामुळे त्यांची पत्रे महाराष्ट्रांतील बहुतेक जहागीरदार व सरदार