पान:श्री महापुरुष ब्रह्मेंद्रस्वामी धावडशीकर.pdf/१३८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१२५ देणं. त्यावरून मनास आणून राजश्री स्वामींच्या सेवेच्या बायका ऐसें जाणून, हे पत्र तुझांस सादर केले असे. तरी तुमची वस्तभाव सुतळीचा तोडा आदि- करून तुह्मांस जी स्वामींनीं दिली आहे, ती मुवा केली असे. तरी वस्तभाव व नक्त व हरचीज व चतुष्पदें देखील जीं असतील तीं, तुझी घेऊन समाधीपार्शी अगर हरएक जागां सुखरूप रहाणे. तुझांस स्वराज्यांतील जो कोणी असेल तो उपद्रव करणार नाहीं तरी तुझी यांसी दरम्यान कोणी मुजाहीम न होणें. यांसी स्वामींनीं जें दिले आहे तें बक्षीस केलें असे. तें हुजरून त्यांला मुबा केलं असे. ते घेण्यास कोणास प्रयोजन नाहीं. जाणिजे छ० २९ जिल्हेज सु। खंमस आर्बेन मया आलफ शके ७१ रक्ताक्षिनाम संवत्सरे माघ शुद्ध प्रति- पदा भौमवासरे आज्ञा प्रमाण (मोर्तब ) ” ह्या पत्रावरून सेवेच्या दासदासी ह्यांच्या हिताबद्दल देखील स्वामींची दूरदृष्टि व कळकळ होती असे दिसून येतें. असो. शाहु महाराज व राणी सगुणाबाई ह्यांनीं, स्वामींचा वृद्धापकाळ झाला असून तनु अत्यंत कृश झाली आहे असे पाहून, त्यांचा वारंवार समाचार घेण्याचा क्रम ठेविला होता. स्वामींच्या वरप्रसादाने छत्रपतींच्या गादीचा बोलबाला झाला ही गोष्ट शाहु महाराज केव्हाही विसरले नाहींत. ते स्वतः इतके विलासरंगी व स्वच्छंदानुवर्ती होते; तथापि स्वामींचा प्रत्येक शब्द त्यांना शिरसावंद्य असे. सर्व मराठे सरदार छत्रपतींची सक्रोध मुद्रा पाहून गर्भगळित होत असत; परंतु स्वामींची पुण्यशील विभूति दृष्टीस पडली कीं, त्यांचा राग क्षणभरही टिकत नसे. स्वामींचीही तशीच स्थिति होती. या अन्योन्य भक्तीमुळे त्यांच्या पर स्परांच्या विनोदपर लीलाही केव्हां केव्हां चालत असत. मनाची कितीही उ द्विम वृत्ति असली, तरी शाहु महाराज त्यांच्या दर्शनास जात; व तेथील शुचि- भूत देखावा पाहून हर्षभरित होत असत. स्वामींच्या अंतकालापूर्वी शाहु महाराज व त्यांची राणी सगुणाबाई हे धावडशीस गेले होते. त्यांच्या भे टीचा साद्यंत वृत्तांत व त्यांचें विनोदपर संभाषण स्वामींच्या बखरींत सविस्तर वर्णिले आहे. तेव्हां त्याची पुनरुक्ति करण्याचें येथें कारण नाहीं. ह्या भेटी- मध्यें स्वामीमहाराज निरवानिरवीच्या गोष्टी अधिक बोलू लागले. त्यावरून शाहु महाराजांच्या व राणीच्या मनास चटका बसून, त्यांना विशेष चिंता उत्पन्न झाली;