पान:श्री महापुरुष ब्रह्मेंद्रस्वामी धावडशीकर.pdf/१३७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१२४ रांनी व जमीदारांनीं व मुकदमांनी वर्तमान व भावी महालांनिहाय आज्ञा केली ऐसीजेः- श्रीमत् परमहंस बावा स्वामी यांच्या सेवेच्या परिचारिका-नांवें वितपसीलः- सेवेच्या बायका. - १ सजणी. १ कृष्णी. १ यशोदा. १ नयनी. १ राधी. १ गोदी. १ नथी. १ येशी. १ गंगी. १ सोनी. १ लक्ष्मी. १ माणकी. १ जवसी. १ नागी. एकूण असामी चवदा राजश्री परमहंस स्वामींची सेवा करीत आहेत. त्यांनीं राजश्री परमहंस स्वामींस विनंति केली कीं, आह्मीं आज पावेतों एकनिष्ठेनें सेवा केली. अशास स्वामीमागे आह्मांस कोणी उपद्रव करील; त्यास स्वा मींनी आपले आज्ञापत्र करून देऊन, दिवाणचे पत्र करून द्यावें; आणि आह्मांस कोणाचा उपसर्ग न लागेल ऐसे करून द्यावें. ह्मणजे आह्मी स्वामींच्या समाधीपाशीं सेवा करून राहूं ह्मणून त्यावरून स्वामींनीं मनास आणून आ ज्ञापत्र करून दिले. बि:- , “श्रीमत् परमहंस भार्गवराम स्वामी यांणीं:-सजणी सेवेस होती. अशास “हिजला मजमागे कोणी हिचे वस्तवानी व कोणेएक गोष्टीस, सुतळीच्या “तोड्यापर्यंत, घेईल आणि उपद्रव देईल; त्याचा निर्देश होईल. त्याचें बरें कधीं “होणार नाहीं. आणि माझे समाधीजवळ राहोन झाडलोट करून रहाशील; “तरी मजमागे माझे कारभारी चालवितील. त्यास जो कोणी लि॥ प्रमाणे न “ऐके, त्याजला शपथ असे. त्याचे आईवर तलाख असे. हें आज्ञापत्र दिले “आहे.” - सदरहूप्रमाणे चवदा असाम्यांस, प्रत्येकीस एक ऐसीं चवदा पत्र स्वामींनीं करून दिलीं. आणि साहेबांस आज्ञा केली कीं, येविषयीं हुजुरचें पत्र करून