पान:श्री महापुरुष ब्रह्मेंद्रस्वामी धावडशीकर.pdf/१३६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१२३ माणें जगन्नाथपंत याचे पुत्रपौत्रादि वंशपरंपरा आह्मी व आमचे वंशांत जे होतील ते चालवितील. यांत अंतर होणार नाहीं (लेखांक ७). " असें ता० ३१ मे ३० स० १७४१ रोजीं उत्तर पाठविलें. नंतर पुढे स्वामीं कोंकणांत गेले. तेथून त्यांनीं जगन्नाथपंत यांस पत्र पाठवून असे कळविले कीं, “चि मणाजीचं पुत्रवत् पालग्रहण केलें. तो तर आह्मांस टाकून गेला. हा मृत्यु - लोक. आमचा भरंवसा आहे असें नाहीं काय ते आमचे पुत्र व शिष्य तूंच आहे. मेळविले गांव, शिव, पैका पुत्रपौत्रादि वंशपरंपरेनें खाणे. तुम्हांस कोणी उपद्रव देणार नाहीं. मजमागे तुमचें शाहू चालवील. कोणते गोष्टीचे चिंता न करणें. जो उपद्रव देईल त्याचा निवेश होईल, हें समजणे.” ह्याप्रमाणें स्वा- मींनीं जगन्नाथ चिमणाजी व इतर कारकून मंडळी ह्यांची यथायोग्य व्यवस्था केली. त्याचप्रमाणे दासदासी ह्यांचीही व्यवस्था करून त्यांना शाहुमहारा- जांची राणी सगुणाबाई हिच्याकडून राजमुद्रेनिशीं अभय पत्रे देवविलीं. स्वामींचा थाट राजदरबारासारखा असल्यामुळे त्यांच्या पदरीं सेवकजन व परिचारिका बहुत होत्या. त्यांपैकी परिचारिकांस दिलेलें अभयपत्र सगुणाबाई राणीच्या राजमुद्रेनिशीं उपलब्ध झाले आहे. ह्यावर ता० २२ जानेवारी ३० स० १७४५ ही तारीख आहे. हे पत्र मौजेचें असल्यामुळे येथे सादर करणें अवश्य आहे. श्रीबालकृष्ण. ( “श्रीमंत सौभाग्यादिसंपन्न मातुश्री बाईसाहेब यांणीं, राजश्री सरदारांनी, पागा शिलेदारांनीं, ठाणेदारांनी, किल्लेदारांनी व कमाविसदारांनीं व चौकीदा- १ हे संपूर्ण पत्र आह्मांस मिळाले आहे परंतु तें रा० राजवाडे ह्यांनी ग्रंथ- मालेमध्ये अगोदर छापल्यामुळे आह्नीं निराळे छापलें नाहीं. (लेखांक २२ ग्रंथमाला पहा.) ह्या पत्रावर रा० राजवाडे ह्यांनी २२ आगष्ट इ० स० १७४० ह्मणून जी तारीख दिली आहे ती बरोबर जमत नाहीं. ज्येष्ठ वद्य ४ दुर्मति नाम संवत्सरे ह्मणजे ता० १३ मे इ० स० १७४१ रोजी चिमणाजी कृष्ण भागवत हे मृत्यु पावले. तदनंतर स्वामी कोंकणांत गेले. अर्थात् इ० स० १७४१ मध्ये जर चिमणाजीपंत बारले तर ३० स० १७४० मधल्या पत्रांत त्यांच्या मृत्यूचा उल्लेख येणें शक्य नाहीं. तेव्हां ही तारीख निःसंशय चुकली असावी. ●