पान:श्री महापुरुष ब्रह्मेंद्रस्वामी धावडशीकर.pdf/१३५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१२२ व त्यांस सर्व सुखदुःखाच्या गोष्टी सांगून व त्याचा आदरपुरस्सर बहुमान करून त्यांना निरोप दिला. नंतर चिमाजीआपा व नानासाहेब पुण्यास परत गेले. बाजीराव वारले त्या वेळीं स्वामींचें वय शंभरांजवळ जवळ आले होतें. त्यामुळे वार्धक्याची छाया त्यांच्या तेजःपुंज देहावर कमीजास्त प्रमाणानें व्यक्त होत होती. तशांत त्यांच्या मनावर हा दुःखाचा भयंकर डोंगर कोसळला, त्यामुळे त्यांच्यावर बराच परिणाम होऊन ते अगदीं कृश झाले. ह्याच समयास त्यांचे मुख्य कारभारी चिमणाजी कृष्ण भागवत हे मृत्यु पावले, व पुढे लव- करच चिमाजीआपाही कैलासवासी झाले. त्यामुळे स्वामींचें मन अधिक अधिक उदासीन होऊन ते राजकीय चळवळींतून अगदीं परांगमुख झाले. ३० स० १७४० च्या पुढे स्वामींच्या राजकारणांचीं पत्र विशेष दृष्टीस पडत नाहींत. व बाळाजी बाजीराव व सदाशिव चिमाजी ह्यांनी स्वामींस गुरुस्थानीं मानून त्यांच्याशी आपल्या वडिलांप्रमाणे पत्रव्यवहार ठेविला होता. परंतु स्वामींचें व त्यांचे बाजीराव किंवा चिमाजीआपा ह्यांच्याप्रमाणे मन मिळालेले दिसत नाहीं. स्वामींच्या कित्येक पत्रांत “बाजीराव व चिमाजीआपा आह्मांसीं निष्ठापूर्वक वर्तत होते. तुझी आह्मांसीं प्रतारणा करितां. ” असे उद्गार निघालेले आहेत. पेशव्यांनी स्वामींच्या दर्पास भिऊन त्यांचीं अनेक वेळां आर्जवें केली आहेत. तथापि ह्या पुढच्या कारकीर्दीत, स्वामींची ती पूर्वीची उमेद, तो उत्साह, व ती चळवळ चांगलीसी निदर्शनास येत नाहीं. त्यांची वृत्ति स्वाभा विकपणे पुढें अधिक सौम्य व विरक्त झाली; आणि त्यांनी आपले इतिकर्तव्य संपले असे समजून, आपल्या देवस्थानांची व आश्रितजनांची पुढील व्यवस्था करण्याकडे लक्ष घातलें. स्वामींचे परमविश्वासू शिष्य व मुख्य कारभारी चिमणाजी कृष्ण हे वारल्यानंतर, त्यांनीं शाहुमहाराजांस पत्र लिहून, चिमणा- जीपंतांचे पुत्र जगन्नाथपंत ह्यांचा प्रतिपाल करण्याबद्दल विनंति केली. त्याप्रमाणें शाहुमहाराजांनी त्यांस " हा मृत्युलोक मानवाचा भरंवसा आहे असें नाहीं. म्हणोन वगैरे उदासीने लिहिलें, त्यास आपण ईश्वर, जें करतील तें होईल. गांव शिव पैका मिळविला यास धनी कोण? असें बहुतप्रकारें लिहून आलें. त्यास, लिहावयाचे कारण काय? मुळींच जगन्नाथपंत याचें पुत्रवत् रक्षण केलें. तेव्हां तो धनी व आम्हांस सर्वांस गुरु, याप्रमाणे आज्ञा जाहली आहे. त्याप्र-