पान:श्री महापुरुष ब्रह्मेंद्रस्वामी धावडशीकर.pdf/१३४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१२१ स्वामींस कळली मात्र, तो त्यांचा हृदयगिरी दुःखरूपी वज्रानें भेदून गेला ! बाजीरावासारखा आज्ञाधारक पट्टशिष्य मृत्युमुखी पडल्यामुळे, स्वामींच्या सर्व राजकारणांचें मुख्य सूत्र तुटून गेले! त्यांच्या उच्च मनोरथसिद्धीचें खरें साधन नष्ट झाले ! त्यांच्या प्रेमसर्वस्वाचा मुख्याधार नाहींसा झाला! त्यांच्या महत्वाकां- क्षेच्या जोमदार तरूचें उन्मूलन झाले; आणि त्यांच्या परोपकृतीचा तेजस्वी दीप मालवला गेला! त्यामुळे त्यांच्या विवेकी व विरक्त मनाची देखील चमत्कारिक स्थिति व्हावी ह्यांत आश्चर्य तें काय? त्यांस बाजीरावांच्या मृत्यूचें विपरीत वर्तमान श्रुत झाल्यानंतर त्यांनीं बहुत शोक आरंभिला; गोमूत्र प्राशन करण्याचें सोडून दिले; आणि अत्यंत उदासीनता धारण केली. आणखी, चिमाजी आपांस • " 66 , लिहिले की “बाजीसारखा शिप्य गेला. या उपर या मुलखांतून जावें किंवा प्राण सोडावा, काय करावें ते लिहिणें.” ह्या हृदयद्रावक पत्रास चिमाजीआपांनीं जें प्रेमळ, करुणरसपूरित व समयोचित उत्तर पाठविले आहे, तें लेखांक १४१ मध्ये छापले आहे. चिमाजीआपांसारख्या सामान्य जनानें स्वामीसारख्या पूर्ण वैराग्य बाणलेल्या तपस्वी साधूचें सांत्वन करण्याचा प्रयत्न करावा व स्वामींनी त्या योगानें शांत चित्त करावें, ही सर्व प्रेमलीला आहे. गुरुशिप्याच्या अकृत्रिम भक्तीचा असा हा अपूर्व मासला इतरत्र क्वचितच पहावयास सांपडेल. असो. . व बाजीराव मृत्यु पावल्यानंतर चिमाजीआपा व नानासाहेब हे स्वामींचे चित्त स्वस्थ करून सातान्यास राजदर्शनासाठी गेले. तेथे छत्रपतींची व त्यांची भेट झाली. नंतर रीतीप्रमाणे दरबाराचा थाट होऊन नानासाहेबांस प्रधानपदाचीं वस्त्रे मिळालीं, व चिमाजीआपांसही बहुमानाचा पोषाक मिळाला. ह्या प्रसंगी त्यांनी स्वामींस लिहिलेली पत्र उपलब्ध झाली आहेत. (लेखांक ५७,१४३, १४४ पहा). त्यांवरून स्वामींचें सान्निध्य व आशीर्वाद त्यांना कल्याणकर झाला असेल असे मानण्यास हरकत नाहीं. पेशवेपदाचीं वस्त्र प्राप्त झाल्यानंतर, उभयतां चुलतेपुतणे धावडशी मुक्कामीं स्वामीमहारा जांच्या भेटीस गेले. तेथें गुरुशिष्यांची सप्रेम भेट होऊन जो करुणरसात्मक प्रकार घडला, तो शब्दांनीं वर्णन करितां येणे कठीण आहे! स्वामींचें दर्शन होतांच परस्पराचीं अंतःकरणे भरून जाऊन त्यांच्या नेत्रांतून घळघळ अश्रुधारा वाहूं लागल्या. स्वामींनी त्या उभय वीरांस दृढालिंगन देऊन प्रेमभरानें कुरवाळिले, ●