पान:श्री महापुरुष ब्रह्मेंद्रस्वामी धावडशीकर.pdf/१३३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१२० नादरशा गेला, तेव्हां चहूंकडे वळवळ करून कजिया करून दाखवावा, उचित नाहीं." ह्मणून लिहिले आहे. याचा विचार काय त्यास लिहून पाठवावा, तं लिहिले पाहिजे. लोभ असों दीजे हे विनंति ” " , ह्या पत्रावर दाखल तारीख छ० ४ रबिलावल म्हणजे ता० ३१ मे इ० स० १७३९ ही आहे. ह्यावरून ते ह्याच समयाचें आहे ह्यांत शंका नाहीं. ह्यानंतर दिल्लीपतीशीं सलोखा ठेवण्याचा निश्चय करून, व माळवा व बुंदेलखंड इकडील राजकारणें उरकून, बाजीराव पेशवे हे निजामाचा मुलगा नासिर जंग ह्याची खोड मोडण्याकरितां दक्षिणेकडे वळले. तो त्याच सुमारास वसईचा कार्यभाग आटोपून चिमाजीआपाही त्यांस येऊन मिळाले. नंतर उभयतांनीं दोनअडीच महिनेपर्यंत गोदावरीच्या कांटीं मोंगलाचा पिच्छा पुरवून त्यास जेरीस आणण्याचा यत्न केला. परंतु तो व्हावा तसा फलद्रूप न होतां मराठी सैन्याचे फार हाल होऊं लागले (लेखांक ५५). तेव्हां त्यांनी मोंगलाशीं तह केला, व मिळाला तेवढा प्रांत संतोषाने पदरांत घेतला. ह्या स्वारींत बाजीरा- वांस द्रव्यलाभ अगदर्दी न झाल्यामुळे त्यांची खर्चाची फार ओढाताण झाली. ह्मणून त्यांनी सातान्यास किंवा पुण्यास न जातां हिंदुस्थानाकडे मोर्चा वळ- विला. इकडे चिमाजीआपा नासिरजंगाची भेट घेऊन, संभाजी आंग्यान कोंकणांत गडबड सुरू केली ह्मणून त्याचे पारिपत्यार्थ पुण्यास आले; व तेथून बाळाजी बाजीरावास बरोबर घेऊन कोंकणांत गेले. लेखांक ५५ व ५६ • ह्या दोन पत्रांत चिमाजीआपांनी आपल्या हालचालीचें इत्थंभूत वर्तमान स्वामींस कळविले आहे. त्यावरून बाजीराव व चिमाजीआपा ह्यांनी को- णत्याही प्रकारें आपली हिंमत खचूं न देतां, मोठ्या उमेदीनें, यशोवैभवाच्या उत्तुंग शिखरावर चढण्याचा एकसारखा प्रयत्न चालविला होता, असें दिसून येतें. परंतु त्यांचं कीर्तितेज विश्वभक्षक काळास असह्य होऊन, त्याने मोठ्या निर्दयपणानें ह्या वीररत्नांवर आपला पाश फेंकून, त्यांस इहलोकांतून उचलून नेले. त्यामुळे सर्व महाराष्ट्र दुःखसागरांत बुडून गेलें ! बाजीरावासारखा तेजोरवि मावळल्यामुळे महाराष्ट्रांत किती हाहाःकार झाला असेल ह्याचें वर्णन लेखणीनें करवत नाहीं ! हा पराक्रमशाली योद्धा ता० २८ एप्रिल इ० स० १७४० रोजीं खानदेशांतील रावेर गांवीं मृत्यु पावला. ही बातमी ब्रह्मंद्र